खेळा खेळा जुगार खेळा पण... एक दिवस सापडणारच...

चंद्रपुर : दहशतवाद विरोधी पथकाने दुर्गापुरात अवैध धंद्यांविरोधात अभियान राबविले असून जुगार खेळणाऱ्या व सट्टापट्टी चालविणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 2 लाख 32 हजारांच्या मुद्देमालासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दहशतवाद विरोधी पथकाला शहरात अवैध धंदे सुरू असलेल्या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले होते. आदेश मिळताच दहशतवाद विरोधी शाखा व मुख्यालयायाचे राखीव दलाने गुप्त माहितीनुसार दुर्गापुर परिसरातील शक्तीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार व सट्टा अड्ड्यावर धाड टाकली यात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच दुचाकी वाहने, इन्व्हर्टर, 4 मोबाईल व इतर साहित्यांसह एकूण 2 लाख 32,620 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात राखीव पोलीस निरीक्षक योगेश्वर पारखी, दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि सचिन राखुंडे, कुशाजी खरबांशी, जितेंद्र आकरे, अजय गिरडकर, महेश खोके, श्रीकांत मोगरम, रूपेश वाढई यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post