तो पुन्हा आला.... वाघाच्या हल्ल्यात तेजराम कार ठार

लाखांदूर :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील तेजराम कार हा शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरीता गेला होता. शेतीचे काम करत असताना अचानक त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने तेजराम कार यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे कान्हाळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post