तीन दुचाकीच्या धडकेत 1 ठार तर 6 जखमी


कूरखेडा-कोरची मार्गावर डोंगरगांव फाट्यानजीक तिन दूचाकीची समोरा समोर धडक झाल्याने १ यूवक ठार तर एक ३ वर्षिय बालीकेसह ६ जन गंभीर जखमी झाल्याची घटणा आज रविवार रोजी सकाळी ११ वाजेचा सुमारास घडली

अपघातात पंकज फूलचंद मडावी (२५) रा गांधीनगर (नान्ही) हा यूवक ठार झाला तर मृतकाचे वडील फूलचंद मडावी (५८) विलास कुंजाम (२४) रा गांधीनगर रूबी हरीप्रसाद शाहू (३) हरीप्रसाद शाहू (३०) गोदावरी शाहू (२५) सोनिया शाहू (२५) सर्व रा गर्रापार ता छूरीया जि राजनांदगांव (छत्तीसगढ़) हे गंभीर जखमी झाले आहे याबाबद माहीती अशी की मृतक आपले वडील व मीत्रासह एका दुचाकीने कोरची येथून कुरखेडा कडे येत होता याच वेळी चंन्द्रपूर येथे बांधकाम कामावरील छत्तीसगढ़ येथील काही मजूर दोन दुचाकीने दिवाळी सनाकरीता स्वगावी जात होते दरम्यान डोंगरगांव फाट्यानजीक वळणावर नियंत्रण सूटल्याने दोन दुचाकीची समोरा समोर धडक झाली याच वेळी मागून येणारी तिसरी दुचाकी सुद्धा याना धडकली या अपघातात एक ठार तर ६ जन जखमी झाले मृतक व जखमीना कोरची येथील १०८ क्रमांकाचा रूग्नवाहीकेने उपजिल्हा रुग्नालय कूरखेडा येथे पोहचविण्यात आले घटनेची माहीती मीळताच कूरखेडा शहर विचार मंचाचे संयोजक माधवदास निरंकारी सचिव उल्हास महाजन प्रवक्ता अॅड उमेश वालदे, राजेश उईके, जावेद शेख, डॉ जगदीश बोरकर, सिराज पठान यानी रुग्नालयात धाव घेत जखमीची विचारपूस करीत त्यांचे सांत्वन केले

Post a Comment

Previous Post Next Post