शेतकऱ्यांना उद्या पाठवणार 2000 रुपये....




मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबरपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेअंतर्गत ८. ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १६,००० कोटी रुपयांची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जाणार आहेत. पुसा कॅम्पसमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेचा हा १२ व्या हप्ता असणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये मदत जमा केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा हा १२ वा हप्ता असेल.

त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत वाढून २. १६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.
याशिवाय पंतप्रधान ६०० पीएम किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटन करतील आणि एक राष्ट्र, एक खत योजनेअंतर्गत भारत ब्रँड असलेल्या अनुदानित युरिया बॅगही सादर करतील. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकारांना सांगितलं की खत क्षेत्रासाठी उचललं गेलेलं सर्वात मोठं पाऊल म्हणून युरिया, डी अमोनिया फॉस्फेट (डीएपी), एमओपी आणि एनपीकेसह सर्व अनुदानित खते देशभरात एकाच ब्रँड भारत अंतर्गत विकली जातील.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान भारत युरिया बॅग देखील सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितले की, सरकार कंपन्यांना भारत ब्रँड अंतर्गत अनुदानित खतांची विक्री करणे बंधनकारक करत आहे. कृषी मंत्रालय आणि खत मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय साप्ताहिक उर्वरक ई-मासिक इंडियन एज प्रकाशित करतील.
याशिवाय कृषी स्टार्टअप कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही ते करणार आहेत. पीएम-किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्याला दरमहा २ हजार रुपयांची मदत दिली जाते. या अंतर्गत तीन महिन्यांसाठी एका हप्त्यात ६००० रुपये दिले जातात

Post a Comment

Previous Post Next Post