नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला...




नवेगावबांध:- पोलिस ठाण्यातंर्गत कोलगाव गोठणगाव मार्गावरील नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज (ता. १५) सकाळी उघडकीस आली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासकार्याला सुरूवात केली आहे. महिलेचा मृतदेह आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.



अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव - गोठणगाव मार्गावर असलेल्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह दिसून आला. सकाळी पेरफटका मारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बाब निदर्शनास आली. दरम्यान याची सुचना त्वरित नवेगावबांध पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोनि संजय पांढरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी तपासकार्य सुरू केले असून अज्ञात महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. महिलेची हत्या की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post