धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 21 ऑक्टोंबर,2022 पर्यंत मुदतवाढ*

गडचिरोली,(जिमाका)दि.13: गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, दिनांक-23 सप्टेंबर,2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 15 ऑक्टोंबर,2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
   तथापी शासन पत्र क्रमांक खरेदी दिनांक 11 ऑक्टोंबर, 2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 21 ऑक्टोंबर,2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 
    जिल्हयातील सर्व धान व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत ऑनलाईन पोर्टलवर (NeML) नोंद करावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.    
     *******

Post a Comment

Previous Post Next Post