22 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या



वढोली : धानापूर येथील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. प्राजक्ता राजेश्वर शेडमाके (२२ रा. धानापूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. स्वतःच्या घरीच दुपारी २ वाजताच्या दरम्यान प्राजक्ताने घरी कुणी नसल्याची संधी साधत गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी शवविच्छेदन करून अंत्यविधी गावात पार पडले. पाच-सहा दिवसांपासून युवतीचे मानसिक संतुलन बिघडले होते, अशी नागरिकांत चर्चा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post