आला रे आला चोर आला... दिवसाढवळ्या शिक्षकाच्या घरी सव्वालाखांची चोरी


आरमोरी:- येथील विद्यानगरात वास्तव्य करणारे शिक्षक दाम्पत्य शाळेत अध्यापनासाठी गेले असताना, भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील मुख्य दरवाजा फोडून सव्वालाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

आरमोरीच्या येथील विद्यानगरातील रहिवासी चंद्रभान नारायण उईके हे पळसगव येथील सरस्वती विद्यालयात शिक्षकपदी कार्यरत आहेत, तर त्यांची पत्नी महात्मा फुले विद्यालय, देऊळगाव येथे शिक्षिका आहे. घटनेच्या दिवशी पती पत्नी व त्यांच्या दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दुपारी घरी कुणीच नसल्याचा फायदा उचलून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडले. त्यात असलेले ३० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये, असा एकूण असा एकूण सव्वालाख रुपयांचा माल लंपास केला. शाळेतून उइके दाम्पत्य परत आल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा व कपाट उघडे असल्याचे व दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.

Post a Comment

Previous Post Next Post