शिक्षिका असूनही आली भोंदूबाबाच्या जाळ्यात : बलात्कार करून 4 लाख लुटले


भोपाळ:- शिक्षित लोकं देखील अंधश्रद्धेला बळी पडतात हे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. डॉक्टरांकडे जाऊन देखील त्वचेच्या आजारापासून मुक्तता न मिळाल्याने ती एका भोंदूबाबा कडे पोहचली. भोंदूबाबा ने तिच्या घरात भूत असल्याचे सांगून तिला पूजा सांगितली. त्यानंतर घरात जीन आहे सांगितले. दरम्यान त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप शिक्षिकेने केला असून त्याने पैशे देखील उकळल्याचे म्हटले आहे. शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोंदू बाबा फरार झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित शिक्षिका (वय 30) त्वचेच्या समस्येने त्रस्त होती. डॉक्टरांच्या औषधांचा काहीही परिणाम होत नसल्याने शिक्षिका भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडली. भोंदू बाबाने पीडितेला घाबरवले की तुझ्या घरात भूत आहे. त्याला पळून लावावे लागेल. घरी पूजा करावी लागेल. मांत्रिकाने पीडितेच्या घरी आणि ओंकारेश्वरच्या घाटावर तांत्रिक उपक्रमांच्या नावाखाली चौकी उभारली. मंत्र वाचले, पण प्रश्न सुटला नाही. शिक्षिकेचा आजार बरा झाला नाही, मग तो म्हणाला, तुझ्या अंगात जिन आहे, त्याला हाकलण्यासाठी शारीरिक संबंध करावे लागतील. तांत्रिकाने तिचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासह चार लाख रुपये देखील लुबाडले आहेत.

जादूटोण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला सर्वस्व गमावल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडितेने पैसे मागितले असता त्याने धमकावले. शिवाय, ॲसिड टाकून जाळण्याची धमकी दिली. सीएसपी पूनम चंद यादव यांनी सांगितले की, शशिकांत सामरे (रा. चिरा खान) असे भोंदू बाबाचे नाव असून, तो व्यवसायाने प्लंबर आहे. त्याने अनेकांना फसवले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. आरोपीच्या आईची चौकशी सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post