नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत २९ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९ २० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजार रुपये किंवा तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह (व्ही के लिस्ट) पहिली यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशिष्ट क्रमांकासहची यादी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक व तालुका सहायक निबंधक कार्यालयात तसेच गावचावडी,ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.



आधार प्रमाणीकरण करा

दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आदेश आहेत. ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आपले सरकार, सी.एस.सी. सेंटर, संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post