तो पुन्हा आला तर नाही ? सालमारा व पालोरा शेतशीवारात सिटी 6 वाघाचे दर्शन… लोकांना प्रत्यक्ष दर्शन व काही पायाचे ठस्से दिसले.



देसाईगंज :- वन विभागाच्या मदतीने नुकताच एकलपूर जवळील वळूमाता जंगल परीसरात तेरा लोकांच्या रडीचा घोट घेवून गतप्राण करणारा सिटी वाघास दि. 13 ऑक्टोंबर ला जेरबंद करण्यास यश मिळाले. त्याचाच जोडीदार सिटी सिक्स वाघ अजूनही मोकडा असल्याने वाघाची दहशत लोकांच्या मनातून निघालेली नाही.


अशातच एक दोन दिवसा पूर्वी सालमारा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांना प्रत्यक्ष दर्शन घडले. थोडक्यात एक माणूस वाचला. तसेच पालोरा शेतशीवारात प्रत्यक्षात वाघाच्या पायाच्या पंजाचे ठसे दिसून आले. त्यामुळे हा वाघ सिटी वन जोडीदार सिटी सिक्स असल्याचा लोक संशय व्यक्त करीत आहेत.


देसाईगंज व आरमोरी वन विभागाचे वतीने गावागावात मुणारी देवून वाघा विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे देसाईगंज व आरमोरी या दोन्ही तालुक्यातील लोक कामा निमित्ताने येत असतात. परंतु. संध्याकाळ होताच लवकर आपल्या गावी परत जातात. सहा वाजल्यानंतर परीसरातील रस्ते सामसूम होतात.


Post a Comment

Previous Post Next Post