आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


सर्वप्रथम ध्वजारोहण करून वंदना घेऊन महापुरुषांना माल्याअर्पण करण्यात आले. त्यानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


यावेळी मोहझरी येथील तुळशीदास वाढई पो. पा. पाटील यांनी 'पानाती पाता वेर मनी शिका पदम समादी यानी ' याचा अर्थ समजावून अष्टांगमार्ग सुध्दा सांगितले तसेच बहुजन समाजाने स्वतःचा विकास करायचा असेल तर महापुरुषाचे विचार आत्मसात करून आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करा असे उत्तम मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.





   तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवनी खुर्द येथील पंढरीजी टेंभुर्णे माजी पो. पा. यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी मार्गदर्शन करून प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे असे यावेळी सांगितले. माजी पो. पा. अण्णाजी निकूरे यांनी सुध्दा 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचा अभ्यास करून स्वतःचा विकास करावा असे सांगितले.



 प्रमुख पाहुणे म्हणून सुपरफास्ट बातमीचे मुख्य संपादक हर्ष साखरे यांनी वर्तमान काळामध्ये काय घडत आहे. आणि यावर मात कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले. तसेच बुद्धाचे विचार आत्मसात करून आपला सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी माहिती सांगितले . जगामध्ये बुद्धाच्या विचारामुळेच छोट्या देशांचा विकास झालेला आहे. परंतु भारताचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही याचे मुख्य कारण अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेमुळेच आज आपलाा भारतदेश मागे पडलेला आहे. आपल्याला भारताचा विकास करायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून नवीन विचारसरणी आणि बुद्धाचे विचार आत्मसात करून भारत एक विकसित देश बनू शकते असे मार्मिक मार्गदर्शन यावेळी केले.





 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मयूर कोडाप सरपंच , अण्णाजी निकुरे माजी पो. पा. राजू टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य, सेवदास भानारकर, भीमराव चौधरी असे मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष रवी शहारे, तर आभारप्रदर्शन अशोक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला मोहझरी येथील बौद्ध उपासक, उपशिका प्रामुख्याने उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post