सहकारात शिक्षण हा केंद्रबिंदू असून शिक्षणाने चळवळीचा विकास होईल सहकार प्रशिक्षण अधिकारी पि.वि.तलमले यांचे मार्गदर्शन



जोगीसाखरा - सहकारी संस्था स्थापन झाल्या की कार्यभाग साधला जातो असे होत नाही. अस्तित्वात आलेली सहकारी संस्था समाजाला किती प्रमाणात उपयुक्त होते यावर खरे म्हटले तर सहकारी चळवळीचे यश अवलंबून असते. सहकारी संस्थेचे यश हे प्रशिक्षित कार्यकर्ते आणि प्रशिक्षित सेवक वर्ग यावरही अवलंबून आहे. या लोकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संस्था टाळू शकत नाही. पण सहकार शिक्षणाचा दृश्य स्वरूपात विचार करण्यापेक्षा त्यात अनुभवण्याचाच भाग जास्त आहे. परंतु शिक्षण हे स्वतंत्रपणे दाखविता येत नाही. ते व्यक्तिभूतच राहते. यामुळेच शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट होण्यास वेळ लागतो. सहकार चळवळीत शिक्षण हा केंद्रबिंदू असून शिक्षणाने चळवळीचा विकास होऊ शकतो सहकारी सोसायट्या केवळ व्यवसाय उन्नती आर्थिक चळवळ असून त्यात शिक्षित कृतीस वाव असतो त्यातुन बहुतेक सहकारी संस्था समाज घटविण्याचे कायाने करु शकतात असे मार्गदर्शन सहकार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पि.वि. तलमले यांनी केले.


महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे अंतर्गत सहकारी शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रम देसाईगंज किदवाही वाड येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या कार्यालयात काल श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सहकार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पि.वि.तलमले संचालक कर्मचारी यांना मार्गदर्शन म्हणुन बोलत होते.
यावेळी जकास संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे संचालक यादोराव कहालकर सुरेश मेश्राम दामोदर मानकर शेषराव काटेगे धमा दिघोरे धर्मराज मरापा गोपाल खरकाटे गोपिकाबाई कोल्हे उज्वलाताई मडावी सचिव गिरीधर नेवारे लिपिक गुणवंत जाभुळे चौकिदार दिवाकर राऊत सुभाष पुराम सुमित बावणे यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी संचालक व कर्मचारी वगानी प्रशिक्षण पुण केल्या बद्दल सहकार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पि.वी.तलमले संस्थेला प्रमाणपत्र बहाल करून श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेनी ९ महिण्यात केलेल्या सामाजिक कायाची प्रसशा केली..

Post a Comment

Previous Post Next Post