नव उत्साही शारदा मंडळ वडमोहल्ला वतीने सत्कार समारंभ

मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मौजा मोहझरी येथे नव उत्साही शारदा मंडळ वड मोहल्ला वतीने शारदा देवी स्थापन करण्यात आली.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून नव उत्साही शारदा मंडळाच्या यांच्यावतीने येथील मोहझरी येथील माजी पोलीस पाटील अण्णाजी निकुरे , शिवनी खुर्द येथील माजी पोलीस पाटील पंढरी टेंभुर्णे तसेच शालिकराम मोहरले माजी सरपंच यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाषणातून मान्यवर मंडळींनी सांगीतले की आपल्या कार्यकाळात जेवढे सण साजरे झाले ते संपूर्ण सन कायदा आणि सुव्यवस्था ठेवून संपन्न केला. आणि समोर सुद्धा कायदा आणि व्यवस्था लक्षात घेऊन असे कार्यक्रम पार पाडून सहकार्य करू असे त्यांनी सांगितले. आणि याला आपला नेहमीच पाठिंबा राहील असे नव उत्साही शारदा मंडळाने आपले मत व्यक्त केले.





या कार्यक्रमाला नव उत्साही शारदा मंडळाचे अनेक भक्तगण, कर्यकर्ते तसेच  मयुर कोडाप सरपंच, तुळशीदास वाढई पो पा. इत्यादी मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संचालन, आभार प्रदर्शन माणिक गेडाम यांनी केले.





Post a Comment

Previous Post Next Post