महीला शिक्षिकानी विद्यार्थ्यांसमोरच केली तुफान फायटिंग

लखनऊ, : शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक जे विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. एका शाळेतील शिक्षिकांचा संतापजनक असा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.


उत्तर प्रदेशच्या हरिमपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. शिक्षिका शाळेतच आपसात भांडू लागल्या. विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी तुफान फायटिंग केली. शाळेला त्यांनी आखाडा बनवून टाकलं.

व्हिडिओ जरूर बघून सबस्क्राईब करा
👇👇👇👇👇👇


व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वर्गात काही विद्यार्थी उभे दिसत आहेत आणि दोन शिक्षिका आपसात भांडत आहे. एक शिक्षिका दुसऱ्या शिक्षिकेच्या हातातील मोबाईल खेचून घेत आहे असं दिसतं आहे. त्यानंतर या दोघींपैकी एक शिक्षिका आणखी एका दुसऱ्या शिक्षिकेसोबत हाणामारी करताना दिसते. दोघीही एकमेकींवर अक्षरशः तुटून पडतात. एकमेकींना ढकलतात.


Post a Comment

Previous Post Next Post