साप चावल्याने महिलेचा मृत्यू


गडचिरोली-
तालुक्यातील पोरला येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 21 ऑक्टोबर शुक्रवारी घडली.

उर्मिला विलास मोहुर्ले वय 40 वर्ष रा. पोरला ता.जि गडचिरोली असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून मृतक महिला शेतात तीळ कापायला गेली असताना

झुडुपात असलेल्या विषारी सापाने तिचा चावा घेतला.तिला गडचिरोली येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने मोहूर्ले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने पोरला गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.गडचिरोली पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post