तुम्ही आमदार, खासदार करोडो रुपये कमविता तर मग आम्ही कमवले तर काय


तेलंगाणातील नालगोंडा जिल्ह्यात असलेल्या मुनुगोडे शहरात पोटनिवडणूक होणार आहे. इथले आमदार कोमातीरेड्डी राज गोपाल रेड्डी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे इथे पोटनिवडणूक लागली आहे. कोमातीरेड्डी यांनी काँग्रेस पक्षाची साथ भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नायक आमदारकीचा राजीनामा दिल्याने होत असलेल्या पोटनिवडणुकीत अनेक मतदारांनी आपले मत कोणाला द्यायचे हे निश्चित केले आहे. या मतदारसंघातील अनेकांशी संवाद साधला असताना मतदारांनी सांगितले

की जो त्यांच्या मतासाठी जास्त पैसे देईल, त्यालाच ते मतदान करतील. इथे एका मतासाठी 10 ते 20 हजार सोडत रुपये मोजले जात आहेत. अंजी नावाच्या मुनुगोडे या मतदारसंघातील आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या मतदाराने सांगितले की, त्यांना तेलंगाणा राष्ट्र समितीने आणलेल्या योजनांचा बराच फायदा झाला आहे, मात्र जो जास्त पैसे देईल त्यालाच मी मतदान करणार आहे.

तुम्ही आमदार, खासदार करोडो रुपये कमविता तर मग आम्ही कमवले तर काय?

अंजी नायक यांनी म्हटले आहे की, नेते मंडळी पैसे कमावतात. ही नेते मंडळी जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच दिसतात. जर ही नेतेमंडळी करोडो रुपये कमावत असतील तर मग त्यातले पैसे त्यांनी आम्हाला देण्यात काय गैर आहे. निवडणुकीच्या शेवटच्या 4-5 दिवसांत जेव्हा ही नेतेमंडळी आमच्याकडे येतील तेव्हा आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ, असे अंजी यांनी सांगितले आहे. मुनुगोडे मतदारसंघात 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदारांची मनधरणी करण्यात तिथली नेतेमंडळी व्यस्त आहेत. यादवैय्या नावाच्या एका गाडगी-मडकी घडवणाऱ्याने म्हटले की, नेतेमंडळी निवडणुका जवळ आल्यानंतरच दिसतात. याच काळात ते पैसेही देतात. जर ते पैसे देत असतील तर ते मी का नाकारू? निवडणुकीसाठी आणलेले 1.4 कोटी रुपयांची बेनामी रक्कम निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आतापर्यंत जप्त केली आहे. ही रक्कम हिमनगाचे टोक असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मतासाठी लाच घेणे आणि देणे हा गुन्हा असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post