हनुमान चालिसा फेम भाजपाची पिट्टू खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ


हनुमान चालिसा फेम भाजपाची पिट्टू खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण, अजामीनपात्र वॉरंटवर कारवाईचे कोर्टाचे आदेश
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी हनुमान चालिसा फेम भाजपाची पिट्टू खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बनावट कागदपत्र प्रकरणी राणा यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आलं होतं. त्याच वॉरंटवर आता पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश शिवडी न्यायालयाने दिले आहेत.


बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाने राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तर नवणीत राणा यांनी देखील अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी एक याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली होती. परंतु आता राणा यांच्याविरोधात कारवाई करावी असे आदेश शिवडी न्यायालयाने दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post