*"सोशल मीडियावर शब्दांचा विपर्याश करणारे सावरकर भक्त आणि बावीस प्रतिज्ञा*



*"देशभर ठिकठिकानी बोद्ध धम्माच्या दीक्षेचे सामुदायिक पातळीवर कार्यक्रम घडून येत आहेत हे आपण सोशल मीडियावर दररोज पाहात आहोत. आपल्यावर व्यवस्थेने लादलेला पुराण धर्माला सोडचिट्टी देऊन हजारोंच्या संख्येने बावीस प्रतिज्ञा जाहीर स्वीकारून बोद्ध धम्मात प्रवेश करित आहेत हे प्रस्थापित व्यवस्थेच्या सावरकर भक्तांना जिव्हारी लागलं आहे. सावरकर ग्रुपचे हे महाशय सावरकर भक्त एक उदाहरण म्हणून तत्कालीन व्यवस्थेमध्ये बुद्ध विचार मांडत असतांना बुद्धाला किती अडीअडचणीला सामोरे जावं लागले असेल बुद्धाला कोणकोणत्या प्रश्नाला सामोरे जावे लागलं असेल हेही समजून घेणे अंत्यत गरजेचे आहे. बावीस प्रतिज्ञा ह्या लहर म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या नाहीत बावीस प्रतिज्ञांची संख्या वाढविणे हाही उद्देश बाबासाहेबांचा मुळीच नव्हता तर "क्रांती आणि प्रतिक्रांती" डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक हे आदी भारतीयांना अभ्यासून घ्यावं लागेल अधिक माहितीसाठी म्हणून अशांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांच्या संदर्भात तेव्हा जे विचार मांडले ते आज देखील या सावरकर भक्तांना तंतोतत लागू पडणारेच असं आहे. बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते. "बुद्ध धम्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे, हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बोद्ध धम्म प्रचारक राजे वाईट होते, असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिद्ध केलेल्या " बोद्धांच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद" या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बोद्ध धम्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिम्मत आहे, बुद्धाचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात शेकडा 75 टक्के ब्राह्मण होते हे सावरकरांना माहीत आहे काय ? सारीपुत्र मोग्गलायन सारखे पंडित ब्राह्मण होते, हे सावरकरांनी विसरू नये. सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ? तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले ! कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझ्या मार्ग निश्चित आहे. मी बुद्ध धम्म स्वीकारणार! तुम्हाला पटला तर तुम्ही ही स्वीकारा. आता पर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धम्माची लाट परतवून लावली गेली परंतु आता बुद्ध धम्माची लाट येईल ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही. बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या काही छिद्र राहिली होती म्हणून या छिद्राद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध प्रवाह दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे."*

*-डॉ बाबासाहेब आंबेडकर "लेखन आणि भाषण" खंड 18 भाग 3 पान नंबर 470.*

*"हिंदूंना माझे एकच सांगणे आहे की तुमचे राजकारण जसे इंग्रजांच्या सत्तेखालून स्वतंत्र होण्याचे आहे तसे आमचेही राजकारण हिंदूंच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याचे आहे. तुम्हाला जसे इंग्रजांचे राज्य नको तसे आम्हाला हिंदुंचे राज्य नको आहे इंग्रज गेले तर हिंदुना स्वराज्य मिळेल इंग्रज जाऊन त्यांच्या जागी हिंदू लोक येतील आज मध्यवर्ती मंत्रीमंडळात काही यूरोपियन आहेत. त्यांच्या जागी ब्राह्मण, कायस्थ, बनिया जाऊन बसतील परंतु या लोकांवर आमचा तिळमात्र विश्वास नाही. गेली दोन हजार वर्ष हिंदुंनी आमची गळचेपी करून दुर्दशा केली. हजारो वर्ष हिंदुरूपी अजस्त्र अजगर आमच्या शरीराभोवती विळखा घालून बसला आहे. ज्यावेळी हा विळखा सुटेल तोच आमच्या स्वातंत्र्याचा दिवस !"* जनता
९ फेब्रवारी आणि २ मार्च १९४६
writings and speeches 
vol. 18 part 3 pej no 25

*"कार्ल मार्क्स म्हणाला की तत्त्वज्ञानाने आजवर जगाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे पण खरा प्रश्न जग बदलण्याचा आहे. आंबेडकरांच्या मते, धर्म आणि धम्म यांच्यातही हाच फरक आहे. धर्मांनी जगाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे तर धम्माचे कार्य जग बदलण्याचे आहे. बोद्ध धम्माच्या संस्कारातून प्रबुद्ध मानव प्रबुद्ध समाज नवा भारत पुढे जाऊन प्रबुद्ध विश्व निर्माण करणे ही आधुनिक धम्मक्रांतीची मुख्य उद्धिष्टे. बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा निर्माण केल्या त्याला हे कारण आहे. आपण जे बुद्ध आणि त्याचा धम्म वाचतो त्यात त्यांनी स्पष्ट आणि मोठा विचार मांडला आहे. त्यात बाबासाहेब लिहितात धर्माचं काम जग कसं आहे हे सांगण्याचे आहे. पण धम्माचं काम त्या जगाची पुनर्रचना करण्याचं काम आहे. पण त्याची पुनर्रचना कशी करायाची हे जर कोण सांगत असेल तर तो धम्म सांगतो. धम्म आणि धर्म यातला जो फरक आहे त्याची मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. भारतासारख्या जाती प्रधान समाज व्यवस्थेमध्ये, जातिव्यवस्थेच्या लढ्यामध्ये जेवढे ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकर देऊ शकतात तेवढी ताकद मार्क्सवादाच्या विचार लढ्यामध्ये नाही. बाबासाहेब कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यात 2381 वर्षांचे अंतर आहे. सांगतात बुद्ध इ. स. पूर्व 563 मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इ. स. 1818 मध्ये मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन असं खुद्द बाबासाहेबांनीच बुद्ध आणि कार्ल मार्क्स या निबंधात लिहिलेलं असता ते स्वतः म्हणतात "जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची काहीही गरज नाही, बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तमप्रकारे प्रस्थापित करून ठेवलेला आहे. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला उत्तर आहे." बाबासाहेबांचे आपल्या जीवनाविषयक तत्त्वज्ञान सुत्ररूपात प्रकट झाले ते 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' या निबंधात प्रथम बाबासाहेबांना बुद्ध धम्म का समजून घ्यावा लागला याचे उत्तर या निबंधात आपणाला सापडते. म्हणून 1956 नंतर बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला रोखण्यासाठी अनेक गतिरोधक विरोधक आपल्या अवतीभवती काही उघड तर काही दाब धरून बसलेले आहेत. "सामाजिक क्रांतीचा प्रश्न हा भारतातील मूलभूत प्रश्न असून समाजवाद्यांना तो टाळता येणार नाही. तुम्ही कोणत्याही दिशेने वळलात तरी जातीचा राक्षस आडवा येतोच आणि त्या राक्षसाला ठार मारल्याशिवाय तुम्हाला राजकीय आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणता येणार नाही कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचे सर्व प्रमुख नेते हे शहरी पांढरपेशे आहेत, त्यांना कोणालाही सामाजिक विषमतेची झळ लागलेली नाही. त्यामुळे मार्क्सचे ग्रंथ वाचून त्यांनी आर्थिक समता हेच त्यांचे ध्येय मानले" बाबासाहेब म्हणाले होते त्या सावरकर भक्त्तांना हे बाबासाहेबांचं बुद्धाविषयी मांडलेले विचार* 
*👉🏻"लोक कल्याणाशी जे प्रश्न संबंधित नाहीत अशा प्रश्रनांवर बुद्धाने भाष्य करण्याचं टाळलं होतं"*
*👉🏻 "बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही. तसेच जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्धधम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धम्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धमात येता येणार नाही" ही भूमिका डॉ बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या पाच वर्षे अगोदर मांडली आहे 14 जानेवारी 1951 साली सांगितलं बुद्ध विचार किती मोठ्या ताकतीचा आहे तो मार्क्सवाद्यांच्या किती पलीकडचा आहे. पुरोगामी, प्रतिगामी या विवेकपंथी यांच्याहीसाठी तो किती व्यापक आहे. आणि मार्क्सवादी विचारवंतांनी वारंवार टीका करण्याचा प्रयत्न करून देखील बुद्ध विचार हा टीकेच्या पलीकडचा आहे. किंवा त्यांची टीका बुद्धाच्या पासंगाला पडत नाही हे अनेक वस्तुनिष्ठ संदर्भ असतांना मी त्याच्यात तात्त्विक बाजूने जाणून घेण्याचा प्रयत्न डॉ बाबासाहेबांनी बावीस प्रकरणात लिहिलेलं 'भारताचे संविधान' आणि धम्मदीक्षेचे क्रांतीविज्ञान बावीस प्रतिज्ञांतून जग बदलण्याची आकांक्षा, मानवी शोषण थांबविण्याची सामाजिक निकड व दारिद्र्य निर्मूलन असा चौफेर कार्यक्रम आखला आहे. या शतकात आणि येणाऱ्या पुढील शतकात सर्वच शतकात बाबासाहेब कितीपुढे गेलेले आहेत याची कल्पना करता येणारच नाही. माणसा माणसांपासून तोडलेलं आणि तुटलेलं मानववंश, समाजशास्त्र आणि एकूणच असीम अर्थशास्त्र सांगत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञा ती धम्मदिक्षा समजून न घेणे हे विज्ञानद्रोह आणि क्रांतीद्रोह ठरणार आहे. "बौद्ध आंबेडकर हे हिंदू आंबेडकरच आहेत" असा आरोप हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणाऱ्या वि. दा. सावरकरांनी केला होता . तोच पुढे जाऊन म्हणतो भगवान बुद्धालाही सनातनी धर्माचे उच्चाटन करता आले नाही. सम्राट अशोकाच्या राज्य शक्तीलाही तिच्यापुढे गुडघे टेकावे लागले तेथे या आंबेडकराची काय कथा ? म्हणून बाबासाहेबांनी धम्म दीक्षादिनी दिलेल्या बावीस प्रतीज्ञा हे धम्मदिक्षेचे विचार आणि आचार क्रांतीविज्ञान 1956 च्या बौद्धांनी हे समजून घेणे गरजेचे आहे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म लहर म्हणून नाही दिला. याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. डॉ बाबासाहेबांचा संबंध लढा मानवी हक्कासाठी होता म्हणून त्यांच्या फोटोची पुतळ्याची पूजा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आदी समजून घेणे गरजेचे आहे. व समजावून देणेही गरजेचे आहे. बाबासाहेबचं म्हणाले होते कोणताही महापुरुष त्यांच्या विचारानेच जिवंत असतो हे विचार जिवंत ठेवण्याचे काम त्यांच्या अनुयायाना करावयाचे असते. बावीस प्रतिज्ञातून डॉ बाबासाहेबांनी आपल्या हातातून संपूर्ण उजेडच आपल्या स्वाधीन केला आहे पण तो समजून घेण्यास आपण खूप तोकडेच झालो आहोत की काय ही शंका येते. बाबासाहेब बुद्धा संबंधी स्वतः लिहितात "बुद्धानी दिलेली शिकवण डोळे झाकून स्वीकारण्यास त्यांनी कधीच सांगितले नाही. महापरिनिर्वाण सूत्रात हा धम्म कारण आणि अनुभव यावर अवलंबून आहे. हा धम्म अंधश्रदेने ग्रहण करू नये." बाबासाहेब आदर्श समाजाचि मांडणी करतांना तीन अपेक्षा व्यक्त करतात एकतर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे दुसरं गरिबीचं उद्धतीकरण नको, तिसरं लोकशाही मूल्यांची जोड देणे बाबासाहेबांना अपेक्षित होत. ते त्यासाठीच म्हणाले धर्मांतर निश्चित ठरल्यानंतर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही. तसेच जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धम्माचे मूळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धमात येता येणार नाही" ही भूमिका डॉ बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या पाच वर्षे अगोदर मांडली आहे. आदर्श समाज घडविण्यासाठी डॉ बाबासाहेबांना विचाराअंति बावीस प्रतिज्ञा द्याव्या लागल्या. संपूर्ण क्रांतीसाठी बावीस प्रतिज्ञाकडे डोळेझाक करुन उद्दिष्ट साध्य होणार नाही. डॉ बाबासाहेबांना समजावून घेण्यास आपण चूक करतो आहोत. डॉ बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा तेव्हा दिल्या नसत्या तर आवतार म्हणून बिबविलेला बुद्ध दोन वर्ष देखील विचाराने टिकला नसता. हे सत्य आहे. वैदिक काळात सब्बे गृहस्ताची व्याख्या होती जो माणूस दारूबाज असेल, व्यभिचारि असेल, झूगारु असेल दररोज जिवंत प्राण्यांची वद करून मास खात असेल कप्पट नितीने कुरूरपणाने हत्या करीत असेल त्या माणसाला सब्बे माणूस, देव माणूस म्हटलं जात होतं. बोद्ध धम्माच्या ऱ्हासाची भारतातील कारणे बाबासाहेबांनी वेळोवेळी मांडलेली आहेत. ती भरून काढण्यासाठी त्यांना बुद्ध आणि त्याच्या धम्म हा सामाजिक ग्रंथ लिहायला तब्बल पाच वर्षे लागलीत त्याच बरोबर बुद्ध पूजपाठ ही पुस्तिका, तेच म्हणालेत क्रांतीला कार्यक्रम नसतो तेव्हा क्रांती कोसळून पडते, त्यांनीच या क्रांतीला अर्थात त्यानंतर बुद्ध धम्माची विसंगत आणि सुसंगत कार्याविषयी नव दीक्षितांना मार्गदर्शन करण्या प्रबुद्ध कृती कार्यक्रम म्हणून बावीस प्रतिज्ञा द्याव्या लागल्यात आणि पुढे प्रचार आणि प्रसारास दरेक बोद्ध व्यक्तीला धम्म दीक्षेचा अधिकार आहे हे जाहीर करावं लागलं आहे. "जगात जोवर न्याय मिळणार नाही तोवर शांतता नांदणार नाही." धम्मदीक्षेच्या भाषणात बाबासाहेबांना याची मांडणी करावी लागली. त्याच दिवशी बावीस प्रतिज्ञद्वारे संस्कार म्हणून आपले वर्तन सुधारण्या प्रतिज्ञातुन जाहीर जबाबदारी टाकली. प्रतिज्ञा म्हणजे दृढनिश्चय, मी सांगतो ते सत्यच होय असे व्यक्तिगत पातळीवरचे आव्हान आहे. "देशातील दैववाद नष्ट झाला पाहिजे ?" "माझा देव धर्मावर बिलकूल विश्वास नाही." "ईश्वर आहे काय ? गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटावयाचे आहे त्यांनी ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे." "शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की दैवावर भरवसा ठेवून वागू नका. जे काय करायचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा." हे वरील बाबासाहेबांचे विवेचन संदर्भ ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी मिळवायचं असतील तर त्यांनी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर "रायडिंग अँड स्पीचस" भाषणे आणि लेखन खंड एक ते बावीस वाचून घ्यावीत आणि महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले हे साहित्य त्याचा संदर्भ देणे कोणतीही चूक नाही. आपण याला संदर्भ म्हणा या ज्ञानात भर म्हणून म्हणा त्या वैदिक काळात त्या त्या वर्णातीला हे वरील त्यांचे हिरो होते. डॉ बाबासाहेबांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या प्रतिज्ञेत विशेष देवांची नावे घेऊन दिल्या त्याचे कारण सर्व सामान्य लोक त्यांची असलेली अठळ श्रद्धा या नावांपुढे जास्त प्रतीची होतीच आजही आजु बाजूला पाहिले तर आजच्या चित्रावरूनहि आपल्या ध्यानात येईल तेव्हाचा काल कसा असेल ? जे काही बाबासाहेबांनी देवांवर, धर्मांवर लिखाण केले आहे ते त्यांच्या संस्कृत वैदिक धर्मग्रंथांच्या आधारावर केलेले आहे. बावीस प्रतिज्ञेत एकामागोमाग संख्या न वाढविता मी कोणत्याच धर्मातील देवाला किंवा देव या संकल्पनेला मानणार नाही अशी एकच प्रतिज्ञा देऊन त्यांना सांगता आले असते. बावीस प्रतिज्ञांमध्ये डॉ बाबासाहेबांनी तत्त्वज्ञान आणि वर्तन यांचा मेळ आणि समतोल घातला गेला आहे. काही अंश धर्म, देवांवर श्रद्धा असलेली सर्वधर्म समभाव म्हणवून जगणारी विचारच करित नाहीत. कोणताच धर्म विचार स्वतंत्र देत नाही. देव, धर्मांच्या प्रेमात पडलेली अशी आपली काही अर्धवट राव म्हणतात इतर धर्मियांना बावीस प्रतिज्ञातील काही प्रतिज्ञा लागू होत नाही. बावीस प्रतिज्ञा ह्या कालबाह्य झाल्या आहेत असे काही महाभाग बेताल व्यक्तव्य करतांना दिसतात उदा. ख्रिश्चन, मुसलमान, वर्णश्रम ब्राह्मणी अर्थात हिंदू वैगरे म्हणून बावीस प्रतिज्ञातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देव आणि अवतार ही खोटी संकल्पनाच कायमचीच नाकारली आहे. देवच नाकारला तर मग पुत्र, प्रेषित मानण्याचा विषयच संपलेला आहे. त्यांचे खलनायकी अवतारी चरित्र हा विचार बुद्धिवाद्यांना कळू हीच मोठी शोकांतिका आहे. हे पुस्तक आदर्श समाजाचे प्रारूप म्हणून आपणाला अभ्यासून समजून घ्यावं लागेल. सर्वधर्म हे एकाच ईश्वराकडे घेऊन जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत आणि या अर्थाने ते समान आहेत असं मानलं तर बुद्ध ईश्वर मानतच नाही. तर मग अवतार कसा काय ठरू शकतो ? मुळात अडीच हजार वर्षापूर्वीच बुद्धानी जग अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. म्हणून सांगितले विज्ञानाचे वय जेमतेम साहाशे वर्षापूर्वीचे आहे. त्याकित्येक वर्षाअगोदर बुद्ध हे सत्य सांगतात बुद्धाचा पुढचा विषयच ईश्वर, आत्मा नरक, परलोक, पुनर्जन्म हा नव्हताच बुद्ध हा एक माणूस होता आणि त्याचा एकमेव विषय हा माणूसच होता. मग बुद्धाला अवतार म्हणून घोषित करण्याचा विचित्र प्रकार या देशात का केला आहे. महायान पंथाने अवतार कल्पना बौद्ध धम्मात आणली. पूजा-अर्चा यांचे स्तोम माजविले या बदलाला जेवढे विरोधकांचे कटकारस्थान कारणीभूत आहे. तेवढेच बोद्ध अनुयायांची गाफिलता कारणीभूत आहे. बुद्धाची क्रांतीप्रवणता त्यांना पेललीच नाही. त्यानंतर जवळ जवळ अडीच हजार वर्षानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची क्रांतीकारी ध्वजा आपल्या खांद्यावर दिली आहे. बाबासाहेबांनी पुन्हा एकदा क्रांतीचक्र फिरविले आहे. नवा आशय आपणासमोर मांडला आहे. म्हणून डॉ बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांतून देव आणि अवतार या संकल्पनेचाच धिक्कार केलेला आहे. देव, अवतार हे सर्व थोतांड आहेच हे रिडल्स इन हिंदुझम मधून बाबासाहेबांनी सिद्ध केलेले आहे. "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथात बोधिसत्व असलेले गौतम सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले या सदराखाली बाबासाहेब खुद्द लिहितात "जातक सिद्धांत अथवा बोधिसत्वाच्या अनेक जन्माचा सिद्धांत हा अवतारवादाच्या ब्राह्मणी सिद्धांतासारखा वाटण्याची शक्यता आहे. उदा. देवाचे अवतार घेणे" बुद्ध विचार संपविण्यासाठी येथे अनेक युक्त्या केल्या गेल्या बुद्ध धम्माला धर्माची शाखा आणि त्याच्या जन्मास विष्णुचा नववा आवतार म्हणून हीनविण्यात येत होते धर्माच्या परंपरेत वाढलेल्या लोकांनी धम्म आणि धर्म यातील फरक जाणून न घेतल्यामुळे ते ज्या चष्म्यातून पाहतात तो चष्मा अवतार आणि अज्ञान अंधश्रद्धेने बरबाटलेला असेल तर त्यांना बुद्ध धम्म या अवतारांच्या नाही हे बावीस प्रतिज्ञेतून बाबासाहेबांना जाहिर सांगावे लागले. बुद्ध धम्मात अंधश्रद्धेला मुळीच थारा नाही. मग अवतारवाद असेलच कसा ? तर्क आणि विवेकी स्वतंत्र देणारा बुद्ध ऐहीपस्सिको असा सताड मार्ग तपासायला सांगतो. बुद्धाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ( ईश्वराची ) पारंपारिक संकल्पना नसलेला धम्म आहे. या धम्मात चक्क ईश्वरच नाही. त्यामुळे ईश्वराचे दलाल म्हणून काम करणारे भट, पुरोहित आणि त्यांनी केलेल्या भोळ्याभाबड्या समाजाचे शोषण नाही. नाना विद्रूप देव, दैवते, दैववाद, आवतार, प्रेषित, पुनर्जन्म, आत्मा, भुतखेत, स्वर्ग नरक, पिंडदान, खोट्या प्रवृत्ती, वृत्तवैकल्ये, ताईत, गंडे, दोरे, मंत्र,तंत्र, माल जप, उपवास शिवाय जाती संप्रादायाची पंथाची विषमतावादी उतरंड या धम्मात नाहीत या साऱ्या भाकड कथा आहेत. 14 जानेवारी 1951 साली वरळी येथे धम्मदीक्षे आगोदार बाबासाहेब जनतेला बजावतात " ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावसा वाटला तर करावा, नाहीतर बाराभाईची खिचडी करून चालणार नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा इतर काही नाही. हे बाबासाहेब त्यामुळेच आपल्या अनुयायांना सांगतात तुम्हाला साऱ्या वाईट चालिरिती घेऊन बुद्ध धम्मात येता येणार नाही, "मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही." बावीस प्रतिज्ञात आठव्या नंबरची विशेषतः ही प्रतिज्ञा का म्हणून देतात बाबासाहेब कारण एकदा टाकलेली थुंकी पुन्हा कोणी कोणत्याही मार्गी चाटायला कोणी जाऊ नये. आपल्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही राबविण्यासाठी देशाला लागलेली विषमतेची, द्वेषभावनेची, अंधश्रद्धेच्या धर्म जातीच्या उच्च नीच्चतेच्या अज्ञानाची कीड धुऊन काढली पाहिजे. हजारो वर्षे ब्राह्मण भुदेव म्हणून मान्यता पावलेल्या या संकल्पनेला दिलेला नकार आणि धर्म जाती, देवाच्या नावावर पोटभरु भटगिरीला, भोन्दूगिरीला, धूर्त, लबाड़ लोकांना दिलेला नकार हा तेवढाच या जगात संशोधनाचा विषय ठरला आहे. काही स्वार्थी लोकांनी बौद्ध वाड्मयामध्ये बुद्धीला न पटणाऱ्या बाबी घुसडविल्या आणि बौद्ध धम्माला अनिष्ट वळण दिले आहे. ह्या प्रतिज्ञा यानिमित्ताने अंत्यत महत्वाच्या आहेत. बुद्ध मानवपुत्र होते. स्वातंत्र, समता आणि बंधुता हा धम्माचा मूलभूत पाया आहे ते करुणाकार होते. त्यांनी आपल्याला झालेले सब्बे सत्ता सुखी असे लोक कल्याणाचे ज्ञान राजापासून रंकला सांगितले. म्हणून बुद्ध धम्माशी विसंगत कार्यें कोणती वर्तन कोणते याची जाणीव करून अज्ञान, विषमता, अंधश्रद्धालु गोष्टींना धम्मात विसंगत असल्यामुळे बंद करावे असं या प्रतिज्ञातून सांगणं आहे. बुद्धाने पंचशील आणि अष्टांग मार्ग व दहा पारमिता दिल्या असतांनाही डॉ बाबासाहेबांना धम्म स्वीकारावेळेस विशेष या प्रतिज्ञा देण्याची गरज का भासली ? तर त्याला कारणही तसेच आहे...भारताची एकंदर परिस्थिति, त्यातील रुढी परंपरा, दैववादाचे धार्मिक उत्साह, व्यसनाधीन प्रवृत्त, प्राण्यांची होत असलेली हत्या, व्यभीचार, जातीव्यस्था व लोकांची इतर जातीतील लोकांशी वागण्याची पद्धति या सर्वांचा विचार करून तसेच भविष्यात हा धम्म अधिक लवचिक व अधिक विज्ञानवादी कसा बनेल या सर्व गोष्टींचा विचार करूनच बाबासाहेबांनी संस्काराचा वर्तनात परिवर्तन म्हणून बावीस प्रतिज्ञांची निर्मिती केली. बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या प्रत्येक व्यक्तीस माणूस म्हणून जगण्यास पुरक अश्या ठरतात या प्रतिज्ञा अंगीकारल्या असता ती व्यक्ती भविष्यात कोणत्याच परिस्थितीत डगमगणार नाही चांगला व्यक्ती घडण्यासाठी पंचशील महत्वाचे आहे तर आदर्श समाज घडण्यासाठी अष्टशील, दहापारमिता आवश्यक आहेत आणि देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा स्वातंत्र, समता आणि बंधुता ही मूल्य जगण्याचा भाग होतील हे मात्र खरे. यातून बाबासाहेबांनी आपली यापुढील गती, प्रगतीसाठी स्वच्छ भूमिका त्यांनी जगासमोर अदा केली आहे. कोणी मग कोणत्याही चेष्म्यातून पाहावे ? डॉ बाबासाहेब सांगतात "धर्म स्वीकारायचा तो पूर्ण तावून सुलाखूनच स्वीकारला पाहिजे. बाबासाहेब लिहितात "सुरा ही सामान्य दारू प्राचीन आर्य हे पुरेसे मद्यपी होते. त्यांच्या धर्माचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मद्य. वैदिक देव दारू पित असत. देवांची दारू 'सोम' या नावाने ओळखली जाई. आर्यांचे देवच दारू पित असल्याने आर्यांनाही दारू पिण्याबाबत कोणतेच बंधन नव्हते. उलट दारू पिणे हा त्यांचा धर्मकार्याचा एक भाग होता. अनेक सोमयाग केले जात होते. सोमरसपान नाही असे असे फारच थोडे दिवस असत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन उच्चवर्णांसाठीच सोमरस होता. याचा अर्थ शूद्र दारू पासून दूर होते असा होते असा मात्र नाही. ज्यांना सोम पिण्याची बंदी होती. ते सुरा पीत असत. सुरा ही सामान्य दारू बाजारात विकली जाई. केवळ पुरुषच दारूच्या आहारी गेले होते असे नव्हे तर, स्रियांनाही दारू हवी असे. अहिंसेचे कोडे कुटप्रश्न 13 रिडल्स इन हिंदुझम' सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि." पंचशीलेत बुद्ध सर्वांत शेवटी हे शील आवर्जून तेव्हा वदवून घेतात कारण ज्या समाजाचे विचारचक्र थांबते तिथे विकृती वास करते अर्थातच डॉ बाबासाहेबांनी जगातील सर्वधर्म आणि धर्मग्रथांची चिकित्सा केली आणि धम्म दीक्षितांना ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या काही जातीय भावना वाढविण्यासाठी नाहीत तर मानवी जीवनांनी अंधश्रद्धा सोडावी आणि बुद्धिवादीची कास धरावी भोळ्या मनाचे आपले अनुयायी बुद्धाच्या नावावर सुद्धा इतरस्त्र भरकटुन जातील याची त्यांना पुरिशी कल्पना होती.*
*18 ) "प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्याथित करेन" यातच त्यांना अभिप्रेत असलेला सम्यक बुद्ध कोणत्याही समाधीच्या भ्रमात आणि संभ्रमात त्यांनी ठेवलेला नाहीत सम्यक विना समाधी, ध्यानाची, विपश्यना हे एक बुद्धिझमला हळूहळू संपविण्याची विकृतीच आहे ही काही संस्कृती नव्हे बुद्धाला संपविण्यासाठी विदेशात आणि आपल्या स्वदेशात अनेक कट्ट रचले गेलेत पण 1956 च्या धम्मक्रांतीने जगाला बावीस प्रतिज्ञा देऊन सम्यक दृष्टी दिली आहे ती दृष्टी विश्व पाहाण्यासाठी आहे. त्या विश्वातील घडामोडी आकलन करून घेण्यासाठी आहे. या व्यवस्थेने हजारो वर्ष झोडपले आता झोपविण्याचे कारखाने जागोजागी बांधत आहेत हे आपण ओळखले पाहिजे. बावीस प्रतिज्ञातील ही अठरावी प्रतिज्ञा तेवढ्याच ताकदीने समजून घेणे गरजेचे आहे त्याला कारण आहे डॉ बाबासाहेबांनी ज्या उद्देशासाठी धम्म स्वीकारला तो उद्देशच आपणाला माहिती नसेल तर त्याची पूर्तता कशी करणार ? धम्म हे जर मानवी जीवनाच्या मुक्तीचे तत्वज्ञान असेल तर त्याच्या काळात नवे आयाम देणे हेच काम बावीस प्रतिज्ञातून बोद्ध धम्माला सरण जाण्यास डॉ बाबासाहेब सांगतात. धर्माच्या जखडातून सुटण्या म्हणून प्रज्ञावंतांचा समाज, अर्थात प्रबुद्ध भारत आणि बौद्धमयविश्व घडविण्यासाठी ते बुद्ध तत्वला अनुसरण्यास सांगतात. म्हणजेच फक्त आणी फक्त बुद्धविचार कृतीत उतरविण्यास सांगतात. येथे शरण जाण्याचा मुद्दा नाही शरण म्हणजे अधिन होणे जे आहे तसे स्वीकारणे हे शरण येथे त्यांनी फरक केला आहे. जसे धर्म आणि धम्म ते म्हणतात धम्माचे नाते विचारांशी आहे. बुद्धाप्रती डॉ. बाबासाहेबांचा महान आदर आहे. कारण बुद्धानीच मानवला विचार स्वातंत्र्य दिले आहे. बुद्धाला अनुसरणे म्हणजे भक्तीचा संप्रादाय न्हवे किंवा भक्ती करणे ठरत नाही. भक्ती करणे हे धम्माच्या तत्वात बसत नाही. अनुसरण करणारा स्वातंत्र्य असतो. धम्मात हेच स्वातंत्र्य आहे. बुद्धाला अनुसरणे म्हणजे एका प्रवाहितपणाचे अनुसरण करणे ठरते अनुसरण करणे म्हणजे डोळे मिठून मालेचा जप करणे न्हवे. बुद्धाच्या दृष्टीकोनातून सर्व मनुष्यमात्र समान हे व्हिजन आहे. बावीस प्रतिज्ञात कोठेही शरण जाण्यास न सांगता शिकवणुकीने वागेन अशाच प्रतिज्ञा आहेत सद्दधम्म म्हणजे दूसरे तीसरे काही नसून तत्वज्ञान आहे. डॉ बाबासाहेबांनी याचा तपशील बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकात मांडला आहे. आपण अभ्यासणे आवश्यक आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने बावीस प्रतिज्ञा दिल्या धम्माचा वेळोवेळी झालेला ऱ्हास किंवा संभाव्य गोंधळाचे कारणच नष्ट व्हावे आपल्या अनुयायांना सुलभ व पूर्णपणे स्पष्टता यावी यासाठी आपल्या धर्मचिंतनाचे रेडिमेड स्वरूप अगोदरच सांगून त्यांना काय स्वीकरायचं आणि काय काय नाकरायचं याचे कष्ट पडू नये म्हणून घेतलेली ती सावधानता, बावीस प्रतिज्ञा हे संक्षिप्त असे प्रियांबल आहे. एका अर्थाने 1956 च्या धम्मदीक्षेने जगात बावीस प्रतिज्ञेद्वारे उजेड संस्कृतीच दिली. बाबासाहेबांनी विज्ञानवादी बोद्ध धम्म स्वीकारला जगात जे काही घडते ते घडण्यासाठी कारण आहे कारण त्यात प्रतित्यसमुत्पाद हा सिद्धांत बुद्ध धम्माचा महत्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताचे विश्लेषण बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथात सविवस्त्रपणे केले आहे. आज आपण पाहतोय रंगात रंगून जाणारे शिक्षित विद्वान घरोघरी आहेत पण मानसिक गुलाम आहेत. मग तो राष्ट्रपती असो की मनोभाव काल्पनिक दैववादास भजनारे डॉक्टर असो, वैज्ञानिक क्षेत्रातील इतरही कोणीही असो पण एखादा शास्त्रज्ञ असतो चंद्र्यान उडवीणारा पण नारळ फोडतो की नाही ? आता विमान ही विज्ञान क्रांती आहे पण रफेळच्या चाकाखाली लिंबू चिरडणारे कॉबिनेट मंत्री आपणही पाहिलेत ही मानसिक गुलामगिरी आहे. तेथे वैज्ञानिक क्षेत्रात सबंध देशाची नालिस्ती तर होतेच पण स्वतःची विद्वत्ता गहन राहते ना? हा प्रश्न आहे. बावीस प्रतिज्ञा कोणत्या धर्माला टार्गेट म्हणून संविधानाच्या शिल्पकाराने दिलेल्या नाहीत भारतात घरोघरी आणि हर शहराच्या गल्लीबोळात मंदिरं आपण उभी पाहतो, आपण मानत असणारे जागृत देवस्थाने तेहतीस कोटी इतर असतांनाही जगात सर्वांत दारिद्र, गरीब, अज्ञानी आपला देश भारत राहवा ही शोकांतिका नाही का ? एवढी हे आपल्याला देश प्रगतीच्या, मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून समजुन घ्यावं लागेल, प्रगितीच्या दिशेने देशाला घेऊन जावं म्हणून घटनेतील कलम 51 ड "समाजवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद रुजविण्या सांगत असता शेवटी प्रबुद्ध भारत घडविण्या बाबासाहेबांना बावीस प्रतिज्ञा निर्माण कराव्या लागल्यात... बुद्धांच्या मुर्त्यां जमिनीची छाती फाडून त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत की बुद्धापूर्वी या पृथ्वीवर कोणतीही मानवी सभ्यता नव्हती, बुद्ध हा मानवी सभ्यतेचा पहिला इतिहास आहे, हा देश बुद्ध लोकांचा आहे आणि हवेत उडणाऱ्या काल्पनिक चमत्कारिक पात्र पुस्तकांत मर्यादित होते. काही लोक म्हणत असतील काहीही समाज जीवनात फरक पडला नाही, पडत नाही. तर बंधू आणि भगिनींनो समाजात बद्दल घडून येत आहे अन्याय अत्याचार विषमतेवादी समाजामध्ये घडणे स्वभाविक आहे तो घडत राहणार, भीमाकोरेगा प्रकरण, खर्डा, सनाई, खेरलांजी ही अमानवी कृत्य आहेतच पण त्याच बरोबर समतेच्या मूल्यांना स्वीकारणारी संख्या जर वाढत असतील अनेक भटक्या विमुक्त जाती जनजमाती धम्म स्वीकारा करत असतील, ओ. बी. सी. बौध्द धम्माच्या वाटेवर अभियान राबवित असतील अनेक इतर धर्म, जातीतील विचारवंत बुद्धाच्या धम्माविषय मांडणी करत असतील तर बुद्धाच्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे हे सगळ्यात मोठं यश हे दिसून येत आहे.*


*- संदीप महाडीक ( क्रांतीभूमी ) 9222437849*

21 ऑक्तोबर 2022

Post a Comment

Previous Post Next Post