कुकडेल येथे बौद्ध समाज यांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा


कोरची:तालुक्यातील कुकडेल येते बौद्ध समाज यांच्या वतीने 14ऑक्टोबर 2022 रोज शुक्रवार ला संध्याकाळी 6.00वा.धम्मचक्र परिवर्तन दिवसा निमित्य Dr. बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पंचरगी ध्वजरोहक म्हणून श्री. मा. भारत नुरूटी पोलीस पाटील कुकडेल, प्रमुख पाहुणे श्री. रमेश तुलावी उपसरपंच ग्रामपंचायत दवडी, सौं मीनाताई राऊत आरोग्य सेविका कुकडेल,यशवंत सहारे, सुदाराम सहारे, लहानू सहारे,मोहन सहारे, राजकुमार नंदेशवर, बाबुराव सहारे,दिपक हलामी, कलिराम गावळे, राजेश कोरेटी, प्रेम तुलावी, चैन केतेंगे, मनोज नुरूटी, विकास सहारे, तुलाराम नंदेशवर, रुपेश नंदेशवर, इंद्रप्रकाश हलामी व सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतजी सहारे यांनी केले तर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित उपासकांना मार्गदर्शन श्री. भारत नुरूटी पो.पाटील,रमेश तुलावी उपसरपंच, सुदाराम सहारे, प्रेम तुलावी, दिपक हलामी, लहानू सहारे, यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अनिल नंदेशवर तर आभारप्रदर्शन किशोर नंदेशवर यांनी पार पाडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता बौद्ध उपसिकांनी परिश्रम केले.

Post a Comment

Previous Post Next Post