अल्पवयीन मुलीवर सख्ख्या मावशाने केला बलात्कार


सडक अर्जुनी :- तालुक्यातील सितेपार येथील अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात पुणे येथील वडगाव, तळेगाव दाभाडे येथे तिच्या सख्ख्या मावशाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची तक्रार तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनला करण्यात आली होती. नंतर २९ सप्टेंबर २०२२ रोजी पिडीत मुलीने वडिलासोबत जिल्ह्यातील डुग्गीपार पोलिस ठाणे गाठत झालेल्या अत्याचाराविरोधात आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मात्र पिडीत मुलीला अद्यापही न्याय मिळाला नसून सदर आरोपी आजही मोकाट आहे. तेव्हा आरोपींवर कारवाई करून कठोर कारवाई करण्यात यावी, न्याय देण्यात यावा अशी मगाणी पिडीत मुलगी व तिच्या वडिलाने केली आहे.

व्हिडियो
👇👇👇👇


तालुक्यातील सितेपार येथील अल्पवयीन मुलगी पांढरी येथे नवव्या वर्गात शिकत असून वडीलापासून विभक्त झालेल्या आईला भेटण्यासी शाळेतून आजीच्या गावी गेली. तिथून आईला भेटण्यासाठी मावशीसोबत पुण्याला राहत असलेलया ठिकाणी गेली. त्यानंतर आईने मुंबईला कामानिमित्त जातो, तू मावशी बरोबर राहा. असे सांगून निघून गेली. आई मुंबईला गेल्यानंतर पिडीत मुलीला मावशीने सांगितले की, तुझ्या आईने दुसरे लग्न केले असून ती नवऱ्यासह राहायला गेली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रात्रीच्यावेळी

मावशी नसताना पिडीत मुलीचा मावसा गुणवंत भोंडेकर (वय ४२ वर्षे ) यांने बळजबरीने तिच्यावर अतिप्रसंग केला. झालेल्या प्रकरणाबाबत मावशीला सांगितले असता याबाबत कुणाला सांगू नकोस नाहीतर बदनामी होईल, असे सांगून पिडीत मुलीला शांत करण्यात आले. मात्र हे प्रकरण येथेच न थांबता पिडीतेवर तिच्या मावसांचे दुसऱ्यांदा पुन्हा अत्याचार केला. तेव्हा पुन्हा घडलेला प्रकारही तिने मावशीला सांगितले व पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास सांगितले. परंतु मावशीने कानाडोळा करत उलट दमदाटी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. नंतर या प्रकरणाबाबत आईला सांगितले पण तिर्ने सुध्दा मुलीला दमदाटी करून गप्पर राहण्यास सांगितले.

👇👇👇👇👇👇


आई, मावशी, मावसा या तिघांनी पिडीत मुलीला गोव्याला नेण्याच्या बेतात असल्याचे मुलीला समजताच सरतेशेवटी सितेपार येथे वडिलांना तिने फोन करून आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पिडीताच्या वडिलांनी पुणे वडगाव येथे जाऊन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. तसेच सितेपार येथे मुलीला घेऊन आल्यानंतर डुग्गीपार पोलिस स्टेशन येथे सुध्दा तक्रार दाखल केली. परंतु, अजूनपर्यत आरोपींवर कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलिस विभागाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने पिडीत मुलगी व कुटूंबीयांकडून पोलिसांवर संशय व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post