केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! -आता 'अशा' वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही*


तुम्हाला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने हवेचे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘स्क्रॅप पाॅलिसी’ आणली होती.

 त्यानंतर आता केंद्र सरकारने गाडीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाहनचालकाकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल - डिझेल दिले जाणार नाही

 *पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?*

 पेट्रोलपंपावर इंधन भरताना आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे, अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. येत्या 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे

 तसेच, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे आढळल्यास वाहनचालकांना ते पंपावरच दिले जाणार आहे. देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ही व्यवस्था केली जाणार आहे

 *मोटार वाहन कायद्यानुसार* - ज्या वाहन-धारकाकांकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसेल अशा वाहनचालकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे   
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास* - पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, हि माहिती आपण इतर वाहनधारकांना शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post