भाऊ... पगार संपला गा.... दे बर लाच.....

वाशिम:- गावाच्या गावठाण्यात असलेल्या भावाच्या घराचे नमुना ८-अ तयार करुन देणे करीता ९ हजार रु लाचेची मागणी करणाऱ्या मानोरा तालुक्यातील गडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक विनोद एस भुरकाडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी अटक केली.

मानोरा तालुक्यातील एका तक्रार दाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार गडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक विनोद एस भुरकाडे याने गावाच्या गावठाण्यात असलेल्या भावाच्या घराचे नमुना ८- अ तयार करुन देण्याकरीता १० हजार रु लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रार दाराने एसीबी कडे तक्रार केल्या नंतर या संदर्भात पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणी कारवाई दरम्यान पंचासमक्ष ग्रामसेवक विनोद भुरकाडे याने तक्रार दाराकडे १० हजार रु मागणी कडुन तडजोडी अंती ९ हजार रु लाचेची मागणी केली. व सापळा कारवाई दरम्यान संशय आल्याने पैसे स्विकारले नाही. परंतु लाचेची मागणी केल्याने ग्रामसेवक भुरकाडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.



Post a Comment

Previous Post Next Post