२०२३ मध्ये नागपूरपेक्षा मोठे आंदोलन होईल थ्री वेज मीडियाला दिलेल्या मुलाखतीत वामन मेश्राम यांचा इशारा



२०३० पर्यंत बहुजन लोकांच्या समर्थनाशिवाय कुठलेही सरकार बनता कामा नये यासाठी आम्ही काम करत आहोत. २०२३ मध्ये नागपूरपेक्षा मोठे आंदोलन होईल असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला आहे. थ्री वेज मीडियाला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.


आपला हरियाणात कार्यक्रम होऊ दिला नाही, त्याला तुम्ही डायरेक्ट आरएसएसला जबाबदार धरले, तर यामागे काय पार्श्‍वभूमी आहे? या प्रश्‍नावर वामन मेश्राम म्हणालेे की, सर्वात म्हणजे आरएसएसच्या कार्यालयावर घेराव करण्याची घोषणा केली नव्हती, कारण ते कार्यालय नाही. तर आरएसएसचे मुख्यालय आहे. मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढण्यात आला होता. आम्ही मौलिक बाब सांगू इच्छितो की, ज्यावेळी आरएसएसवर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी आरएसएसने आर्टीकल १९ नुसारच आपल्या संघटनेचा बचाव करून बंदी हटवली होती. आरएसएसची बिघडलेली मुले आहेत. जे राजसत्तेत बसलेले लोक आहेत. ते बिघडलेल्या मुलांपैकी जयहिंद नावाच्या ब्राम्हणाला समर्थन देऊन गुंडागर्दी करण्याचे काम केले, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करू शकलो नाही. माझ्याकडे आता खाप पंचायतीचा प्रस्ताव आलेला आहे. आपण हरियाणात यावे, आम्ही आपला कार्यक्रम लावतो. आपण जे काम केले ते फार मोठे आहे. येणार्‍या काळात मी खाप पंचायतीच्या प्रस्तावावर विचार करत आहे. आरएसएस मुख्यालयावरील प्रोटेस्ट मार्च हा विचारपूर्वक करण्यात आला आहे. कारण हे आरएसएसची मुले आहेत, ज्यांनी हे सरकार बनवले आहे. आरएसएसची ती मुले असल्याने मुलांना पकडण्यापेक्षा बापालाच पकडू या असा आम्ही विचार केला. बापाला पकडले तर मुलगाही जामीनासाठी येईल. जामीनासाठी येतील तेव्हा त्यांचाही बंदोबस्त होईल. हा त्यामागील विचार होता. त्यामुळेच आम्ही विचाराला आधार बनवून आरएसएस मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढला.


आपण आरएसएस मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढला. ज्यावेळी आरएसएसची स्थापना झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत अशी घटना पहिलीच घडली. ही संघटना सरळ सत्तेत दिसत नाही, मात्र अप्रत्यक्ष रूपात ते सत्तेत संचलन करत आहेत. अशाप्रकारचा आरोप होत आहे. मग ते आपण पुराव्यानिशी कसे काय सांगू शकतात? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले की, याचा पुरावा असा आहे, आरएसएसचे लोक ओबीसीच्या जातीआधारित गणनेचा विरोध करत आहेत. केंद्रात आरएसएसच्या समर्थनाचे सरकार आले, आरएसएसने ओबीसी असलेल्या एका व्यक्तीला देशाचा प्रधानमंत्री म्हणून नॉमिनेट केले. नॉमिनेट केल्यानंतर ते देशाचे प्रधानमंत्री झाले. ते ओबीसीचे आहेत. आरएसएसने ओबीसी व्यक्तीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. आम्ही ओबीसीची जातीआधारित गणना करणार नाही हे दस्ताऐवजी प्रमाण असून आरएसएसच देशाला चालवत आहे. नरेंद्र मोदी मुखवटा आहेत, आरएसएसचे लोक देशाला चालवत आहेत. संविधानाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतली मात्र आरएसएस लोकांनी संविधानाची शपथ घेतलेली नाही. परंतु सारे सूत्रधार आरएसएसचे लोक आहेत. सारे निर्णय तेच घेत आहेत. एक ओबीसीचा व्यक्ती ओबीसीच्याविरोधात कसा काय निर्णय घेऊ शकतो? असा निर्णय घेऊ शकत नाही, ते काही स्वाभाविक वाटत नाही.ते नैसर्गिक वाटत नाही. आरएसएसच्या लोकांनी निर्णय घेतला आणि मोदींच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. हा कागदोपत्री पुरावा असून आरएसएस देश चालवत आहे.


आपले आंदोलन झाले, प्रोटेस्ट काढण्यात आला. देशभरात असा माहोल आहे की, अशाप्रकारे काही केले तर धमकी येते. आपण राष्ट्रीय आंदोलन चालवत आहात, या आंदोलनाचा काय परिणाम झाला, आपल्याला धमकी आली आहे का? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले, आरएसएसच्या मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च करण्याचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा त्या मुख्यालयाची सुरक्षा महाराष्ट्रातील पोलीस करत होते. वामन मेश्राम महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे पोलीसांमधील काही लोक मेश्राम यांचे समर्थक असू शकतात. त्यामुळे मोहन भागवत यांनी सुरक्षेसाठी सीआयएसएफ केंद्राकडे मागितली. ते घाबरले तेव्हा सीआयएसएफ १५० लोकांचे मागवले. आम्ही कुठल्याही प्रकारे न घाबरता प्रोटेस्ट मार्च काढण्याचा निर्धार पक्का केला, त्यावेळी १५० लोकांकडून सुरक्षा होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. २-३ लाख लोक आले तर १५० लोक काय करणार? त्यामुळे त्यांनी परमनंट ७० कमांडो लावले. यावरून सिद्ध होते की, आरएसएसचे लोक घाबरले आहेत ते मला काय धमकी देणार? त्यांची काय औकात आहे? आरएसएस मुख्यालय आमच्या लोकांनी घेरलेले आहे. ते काय करणार? मला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे मुख्यालय नेहमी असुरक्षित राहिल.


सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. लोक घाबरलेले आहेत. येणार्‍या कालखंडात या देशातील लोकशाही समाप्त होण्याचा धोका आहे. संविधान धोक्यात आहे. या बाबी लोकांमध्ये प्रचलित का झाल्या? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले की, आरएसएसच्या लोकांनीच घाबरवले आहे ना. आम्ही आरएसएसच्या मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च घेऊन जाण्यामागे हेदेखील एक कारण आहे. त्यांनी सार्‍या देशभरात लोकांना घाबरवले आहे. या भीतीला समाप्त करणे गरजेचे आहे. तेथे मोर्चा घेऊन जाण्याची आम्ही घोषणा केली तेव्हा ३ लाख लोक एकत्र आले. देशभरातील सार्‍या लोकांची भीती आता समाप्त झाली आहे. आता लोकांच्या मनातून भीती गायब झाली आहे. वामन मेश्राम यांनी त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांच्या समर्थनात आहोत असे लोक सांगत आहेत. आम्हांला ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्याकडे मोठी शक्ती आहे.


५ ऑक्टोबरला धम्म चक्र प्रवर्तन दिन होता. देशभरातील धम्म अनुयायी व ओबीसीचे लोक मोठ्या संख्येने तेथे येतात. धम्म चक्र प्रवर्तन दिनाला लोक येतात ते लोक ६ ऑक्टोबरला यावेत यासाठी या वेळेची निवड केली का? की दुसरे कारण आहे? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले, दीक्षाभूमीवर येणार्‍या लोकांच्या सपोर्टमुळे आम्ही हे करत आहोत असे पोलीसांनी मिस अंडरस्टँडींग केले होते. दीक्षाभूमीवर येणारे लोक महाराष्ट्रातील अथवा देशभरातील माझेच समर्थन करतात. असे समर्थक लोक धम्म चक्र प्रवर्तन दिला येऊ शकतात आणि आंदोलनातही येऊ शकतात. अशा प्रकारचा आम्ही विचार केला म्हणजे लोकांचा दोन्ही उद्देश पुरा होतो. दीक्षाभूमीवर येणारे लोक आमचे मोठ्या संख्येने समर्थक आहेत. आमचे संघटन गावा-गावात पसरले आहे. त्यांचे आम्हांला समर्थनदेखील आहे व त्यांना आंदोलनदेखील हवे. दीक्षाभूमीवरदेखील ते येतात, ते आमच्या संघटनेसोबत आहेत. लोकांचे दोन्ही उद्देश पूर्ण होण्यासाठी तारीख निवडण्यात आली. त्या तारखेला सोडूनही आम्ही लोक मोठा मोर्चा काढू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. आमच्या लोकांच्या २०० कि.मी. पर्यंत गाड्या रोखल्या गेल्या होत्या. एवढ्या दूरवर कमीतकमी १ लाख लोकांना पोलीसांनी रोखले होते. वाशीमपर्यंत गाड्या रोखण्यात आल्या होत्या.


आपल्याला पोलीसांनी डिटेन केले, त्यावेळी आपण पाणी पित होतात, परंतु ती बॉटलही हिसकावून घेण्यात आली. मानवी अधिकाराचे हे उल्लंघन आहे. आपण काय बोलाल? या प्रश्‍नाला उत्तर देताना मेश्राम म्हणाले की, याबाबत हायकोर्ट किंवा आवश्यकतेनुसार सुप्रीम कोर्टात हा विषय घेऊन जाणार आहोत. हे मानवी अधिकाराचे उल्लंघन आहे. ऍट्रोसिटीचादेखील उल्लंघन आहे. ऍट्रोसिटी कायदा लागू करण्यासंदर्भात विचार करत आहोत. वकीलांना सांगण्यात आलेले आहे. आपण बहुजन विचारधारा चालवत आहात. असे विचार केले जाते की, ज्यावेळी ऍट्रोसिटीचा सहारा घेतला जातो, त्यावेळी बहुजन संघटनेसोबत छेडछोड होते, आपण नेता असूनही असे बोलत आहात, तर सामाजिक स्तरावर मर्यादा उल्लंघित होत आहे असे वाटत नाही का? यावर मेश्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्हांला आंदोलन करण्याचा अधिकार दिला. या अधिकाराचे रक्षण करण्याचे काम सुप्रीम कोर्टाने अनेकदा केले आहे. नागरिकांना आंदोलन करण्याचा मौलिक अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने अनेकदा आदेश दिला आहे. त्या अंतर्गत आम्ही ते करत होतो. मर्यादेचे कुठलेही उल्लंघन करत नव्हतो. संविधानाच्या कक्षेत राहून काम करत होेतो. एवढेच नाही तर तेथील न्यायपालिका आमच्या सपोर्टमध्येच निर्णय देणार होती. त्यांना धमकी देऊन रोखण्यात आले.


मानवाधिकार उल्लंघन केल्याबद्दल आपण पोलीसांविरोधात ऍट्रोसिटी लावण्याचा निर्णय घेतला. बहुजन विचारधारेच्या लोकांमध्ये ओबीसीदेखील आहेत. ब्राम्हणेतर समाज येतो. ऍट्रोसिटीचा सहारा घेताना यामध्ये अघटित होते असे तुम्हांला वाटत नाही का? यावर मेश्राम यांनी सांगितले की, आम्ही या बाबीला मानत नाही. कारण ऍट्रोसिटी कायदा एससी-एसटीच्या प्रोटेक्शनसाठी आहे. आमच्यासोबत देशभरात जे ओबीसीचे लोक आहेत, ते या बाबीला बरोबर मानतात. ते आमच्यासोबत आहेत. ओबीसी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी त्याचा वापर केला जात आहे. एससी, एसटी, ओबीसी लोकांनी मिळून-मिसळून ही बाब आम्ही करू इच्छितो. अस्पृश्येच्या आधारावर एससी, एसटी लोकांवर अन्याय-अत्याचार होत आहे. ओबीसीसोबत जातीच्या आधारावर अन्याय-अत्याचार होत आहे. जातीच्या आधारावर अन्याय-अत्याचार होत आहे तर ओबीसींनीदेखील या कायद्यासाठी मागणी करा असे आम्ही त्यांना सांगत आहोत. आम्ही तुमचे समर्थन करू. आमच्यासोबत अस्पृश्य म्हणून अन्याय केला जातो. तुमच्यासोबत जातीच्या आधारावर होतो. कायदा करण्यासाठी आपण आवाज उठवा आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आम्ही ओबीसीला सांगितले आहे. ते लोक आमच्या बाबीशी सहमत आहेत.


संघटनेच्या पातळीवर आपण केडरला समजावले आहे. सामाजिक दायित्व त्या लोकांना समजावले आहे. बामसेफसारखे संघटन एससी, एसटी, ओबीसीसारख्या लोकांना घेऊन काम करत आहे. आपण ६ ऑक्टोबरला आंदोलन केले आणि भारतातील आम जनतेच्या चर्चेचा विषय आपण झालात. त्याचा परिणाम संघटन व्याप्तीसाठी होऊ शकेल का? अशी आपल्याला आशा वाटत आहे का? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले की, माझ्यासोबत पोलीसांनी मानवी अधिकाराचे उल्लंघन केले. त्याचा परिणाम दहापट समर्थन मिळवण्यात झाले. माझे समर्थन दहापट वाढले. मी जेथे जातो तेथे माझा विरोध करणारे लोकही माझ्या समर्थनात आले. आपणच लढाई लढू शकता, दुसरा कुणीच लढाई लढू शकत नाही असे लोकांना कळून चुकले आहे. त्यांचीसुद्धा मी लढाई लढू शकतो. आरएसएससारखी संघटना आहे. १९७७-७८ च्या दरम्यान परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी एक राष्ट्रीय आंदोलन सुरू झाले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात त्यांना सहभागी करण्यात आले. त्यानंतर आरएसएस-भाजपाचे जे संघटन आहे, त्यांना बहुजन विचारधोरच्या लोकांनी उत्तर प्रदेशात समर्थन दिले, बहुजन विचारधारा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते. बहुजन विचारधारेच्या माध्यमातून आरएसएस-भाजपाकडे सामाजिक व राजकीय स्वरूपात त्यांना कसे पाहता? मी असे मानतो तेथे बहुजन समाज पार्टीचे सरकार बनवताना त्या परिस्थितीला लक्षात घेताना एससी, एसटीमध्ये भांडणे लावण्याच्या उद्देशाने त्यांनी असे केले. आमचे समर्थन करणे त्यांचा उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश समाजवादी पार्टी ओबीसींची होती. त्यांचा उद्देश एससी, एसटीमध्ये भांडणे लावण्याचा होता. आमचे समर्थन करणे त्यांचा उद्देश नव्हता. हा राजकीय डावपेचाचा विषय आहे. रणनीतीचा विषय आहे. आरएसएस व ब्राम्हणांना भीती होती की, उत्तर प्रदेशात ८० लोकसभेच्या जागा आहेत. तेथे एससी-एसटी मिळून काम केले तर त्याचा देशभराच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल. देशभरात एससी-एसटी आणि ओबीसी लोक मिळून काम करतील. असे झाले तर ब्राम्हणांच्या राजकारणाला धोका निर्माण होईल. त्यामुळे एससी विरूद्ध ओबीसीचे भांडण लावण्यासाठी त्यांनी असे काम केले.


संवैधानिक लोकशाहीत एक मजबुरी आली आहे. सामाजिक आंदोलन चालवून सामाजिक क्रांतीचा आपण पहिल्यांदा विचार करतो. तरीही राजनितीक सत्ता मोठे काम करते. २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन करायचे म्हटले तर बहुजन क्रांती मोर्चा व वामन मेश्राम काय करणार आहेत की ही परिस्थिती बदलून जाईल? २०२४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार येऊ म्हणून अनेक पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. सारी ताकद पणाला लावू त्यांना रोखण्यासाठी. आरएसएस-भाजपाचे सरकार येऊ देणार नाही. विरोधी पार्टी कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांना त्यांनी कमजोर केले. याला कारण विरोधी पक्षातील कुणाकडे आरएसएससारखा केडर बेस ऑर्गनायझेशन नाही. भाजपाच्या समर्थनात केडर बेस ऑर्गनायझेशन आहे. विरोधी पक्षाकडे सपोर्ट देणारा केडर बेस ऑर्गनायझेशन नाही. तो सपोर्ट देण्याचे काम आम्ही जर का केले तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपा जिंकू शकत नाही. एवढ्या आमच्या केडर बेस ऑर्गनायझेशनची ताकद आहे. लोकसभेचे २५ ते ३५ टक्क्यार्ंपंत उमेदवार आहेत, ते २५ हजार व ५० हजारांच्या अंतराने जिंकले आहेत. आमच्या प्रत्येक निवडणूक क्षेत्रात ५० हजार ते १ लाख लोकांचे समर्थन आहे. ६ ऑक्टोबरच्या आंदोलनामुळे आणखी मजबूत झाले आहे. २०२४ च्या निवडणुकीत कमीतकमी ३०० आणि जास्तीत जास्त ५०० लोक जागेवर काम करतील.


राजकीय परिस्थिती जेव्हा बनते तेव्हा राजकीय ताकद बघितली जाते. सामाजिक ताकदीवर राजकीय ताकद निर्भर होऊ शकत नाही. २०२४ मध्ये बदल करण्याचा आपला उद्देश असेल तर राजकीय अनिवार्यतेकडे आपण कसे पाहता? त्यावर काय म्हणाल? यावर मेश्राम म्हणाले, आमचे मित्रपक्ष आहेत तेदेखील गठबंधनात राहतील. राजकीय सत्ता त्यांना मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मित्र पक्ष काम करतील. नितीशकुमारांनी भाजपाला फटकारले आहे. राजकीय माहोल बदलण्यासाठी प्रयत्न होत आहे, मात्र बहुजन राजकारण करणारे पक्ष कुठल्या चर्चेत किंवा नजरेत येत नाहीत यावर काय म्हणाल? यावर मेश्राम म्हणाले, मात्र येणार्‍या कालखंडात ही चर्चा सुरू होणार आहे. आता तर विरोधी पक्षातील लोक एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचा कुठला ना कुठला तरी या वर्षाच्या समाप्ती होताना निर्णय येऊ शकतो. एक विशाल गठबंधन बनले आहे याची माहिती आपल्याला मिळेल. त्या माध्यमातून २०२४ च्या महागठबंधनमध्ये भाजपाचा पराभव केला जाऊ शकतो.


आरएसएस संघटन बनले तेव्हा ते दिवसेंदिवस वाढत गेले. बहुजन विचारधारेच्या ज्या सामाजिक संघटन आहेत त्यांच्यामध्ये फाटाफूटदेखील आहे. मात्र एकत्रित येण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. परंतु त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही. ही फाटाफूट थांबवण्याचे काम बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करणार का? करणार तर कुठल्या स्वरूपात करणार? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले की, तहसील, जिल्हा, कमीशनरी व राज्य स्तरावरील ज्या संघटना आहेत त्यांना को-ऑर्डीनेशन करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा काम करत आहे. या कामासाठी लोक तयार आहेत. आम्हांला पुढाकार घेण्यासाठी सांगितले जात आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत. भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ६ ऑक्टोबरचे आंदोलन करण्यात आले, त्यांच्यासोबत बहुजन क्रांती मोर्चा नावाचे संघटन आहे. एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटीच्या सामाजिक व राजकारणाच्या लोकांना एकत्रित करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. देशभरात काम करत आहोत. काही दिवसात संघटनेच्या स्तरावर मोठ्या संख्येने लोक एकत्रित येतील हे तुम्हांला दिसून येईल. बहुजन विचारधारेचे आपण देशातील असे एक नेते आहात की ज्यांना देशभरात ऐकले जाते. तुमच्याशी वैचारिक मतभेद असो अथवा नसो, मात्र ऐकले जाते. ६ ऑक्टोबरच्या नंतर तुमच्या नेतृत्वाच्या स्विकृतीचा कक्ष वाढला आहे. या परिस्थितीत तुम्ही आंदोलनाला देशभरात एक नवीन आयाम कसा देणार आहात? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले, २०३० पर्यंत बहुजन लोकांच्या समर्थनाशिवाय कुठलेही सरकार बनता कामा नये यासाठी आम्ही काम करत आहोत. नागपूरपेक्षा २०२३ मध्ये मोठे आंदोलन होईल. आपण लोकांना जो संदेश दिला तो लोकांपर्यंत पोहचला, मात्र नेतृत्व म्हणून काय संदेश द्याल? यावर मेश्राम म्हणाले, एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीचे लोक आपल्यावर होणार्‍या अन्यायाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी एकता कायम करायला हवी. एकता कायम केल्याशिवाय संविधान वाचवण्याचे व हक्क आणि अधिकार सुरक्षित राखण्याचे काम करू शकत नाही. सार्‍या देशभरात लोकांना एकत्रित करण्यासाठी मी त्यांना मदत करू शकतो. संविधान वाचवण्यासाठी मी मदत करू शकतो. ते माझी मदत घेऊ शकतात, असे करायला हवे असा माझा संदेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post