शेतात कोंबड्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत शॉकने कोंबडी चोरण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा झाला जागीच मृत्यू



चंद्रपूर : शेतात कोंबड्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत शॉकने कोंबडी चोरण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेतमालकाला कळली. मात्र, पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने मृतदेह लपवून ठेवला; परंतु तो इसम बेपत्ता असल्याची तक्रार रामनगर पोलिसांत दाखल झाली. पोलिसांनी तपास केला असता सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी शेतमालकावर कलम ३०४, २०१ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे. प्रदीप दामोदर टेकाम (रा. अजयपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे, तर अमोल मारोती नागरकर (३२, रा. अजयपूर) असे मृतकाचे नाव आहे.

दिवाकर मारोती नागरकर यांचे अजयपूर येथे शेत आहे. त्याने शेतीसह कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला.रात्री कोंबड्याचे इतर प्राण्यांपासून सरंक्षण व्हावे, यासाठी परिसरात विद्युत शॉक लावला. २० सप्टेंबर रोजी अमोल नागरकर हा कोंबडी चोरण्याच्या उद्देशाने शेतात गेला. यावेळी विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतमाल प्रदीप टेकाम शेतात गेला असता, त्याला मृतदेह आढळून आला. भीतीपोटी त्याने त्याचा मृतदेह शेजारच्या आत्राम या शेतकऱ्याच्या शेतात लपवून ठेवला.मुलगा घरी आला नाही म्हणून वडिलाने रामनगर पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व पोलीस हवालदार सुदाम राठोड यांनी तपास केला असता, विजेचा शॉक लागून अमोलचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. त्यावरून प्रदीप टेकाम याच्याविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. अंबादा चोफले यांनी प्रकरणाचा तपास केला.

Post a Comment

Previous Post Next Post