ऑक्सफॅम इंडिया २०२१ ते २०२२ चा अहवाल डोळे विस्फारणारा देशातील मीडिया हाऊसमध्ये ८८ टक्के उच्च जातींचा (ब्राम्हण) कब्जा देशामध्ये मीडिया हाऊसमध्ये ८८ टक्के उच्च जातींचा (ब्राम्हण) कब्जा असल्याचे ऑक्सफॅम इंडियाच्या २०२१ ते २०२२ च्या अहवालात म्हटले आहे. ब्राम्हण-बनियांनी मीडियावर कब्जा केल्याने कुणालाच न्याय मिळताना दिसून येत नाही.





एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी स्वयंसेवी संस्था ऑक्सफॅम इंडिया आणि न्यूज वेबसाइट न्यूजलॉंड्रीच्या अहवालात असे म्हटले आहे की अनुसूचित जाती आणि जमाती व ओबीसी समाजातील लोक कोणत्याही मीडियात मुख्य प्रवाहात नेतृत्वाची भूमिका बजावताना दिसत नाहीत. मीडिया हाऊसमध्ये जास्त संख्येने उच्च जाती (ब्राम्हण) वर्ग कार्यरत आहे. विशेष म्हणजे २०१८-१९ मध्येही हीच परिस्थिती होती, ज्यामुळे भारतीय मीडियामध्ये ओबीसी एससी, एसटी, एनटी, जातीचे प्रतिनिधित्व वाढलेले दिसत नाही.
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या कालावधीत ‘हू टेल्स अवर स्टोरीज मॅटर्स रिप्रेझेंटेशन ऑफ मार्जिनलाइज्ड कास्ट ग्रुप्स इन इंडियन मीडिया’ या शीर्षकाचा अहवाल तयार केला गेला आहे. या अहवालात बायलाइन काउंट पद्धतीचा वापर विविध माध्यम संस्थांमधील विविध जातींमधील लोकांच्या प्रतिनिधित्वाचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडिया आउटलेट्समधील २१८ नेतृत्व पदांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यापैकी १९१ पदे (८८ टक्के) उच्च जातीतील (ब्राम्हण) प्रवर्गातील लोकांची होती. दोन पर्यायी मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये ब्राम्हण वर्गातील २ लोक नेतृत्व पदावर होते.
२०१८-१९ मध्येही परिस्थिती वेगळी नव्हती. न्यूजरूम मधील १२१ नेतृत्व पदांपैकी १०६ (८८ टक्के) उच्च जातीच्या (ब्राम्हण) पत्रकारांकडे पदे होती. ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत त्याच पद्धतीचा वापर करून करण्यात आला. सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये अँकर आणि लेखक यांसारख्या पदांवर देखील उच्च जातीतील (ब्राम्हण) वर्गातील लोकांना जास्त प्रतिनिधित्व दिले गेले आहे. 




मुद्रित माध्यमांबद्दल बोलायचे तर, इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रांमधील ६० टक्क्यांहून अधिक बायलाइन लेख हे उच्च जातीतील (ब्राम्हण) वर्गातील लोकांकडून लिहिलेले असतात. ५ टक्क्यांपेक्षा कमी लेख एससी, एसटी, एनटी समुदायांनी लिहिलेले होते आणि १० टक्के लेख ओबीसी या प्रवर्गातील होते.जवळपास सर्वच मासिकांतील निम्म्याहून अधिक लेख उच्च जातीतील (ब्राम्हण) पत्रकारांनी लिहिलेले होते. एका नियतकालिकात अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व १० टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते आणि एसटी प्रवर्गातील लोक शून्य किंवा अस्तित्वात नव्हते.


हिंदी वृत्तपत्रांचीही तीच स्थिती आहे. ओबीसी एनटी पत्रकारांचे प्रतिनिधित्व खूपच कमी होते, त्यानंतर एससी आणि एसटी पत्रकारांचे प्रतिनिधित्व होते, जे बायलाइन केवळ ०.६ टक्के होते,असे अहवालात म्हटले आहे. टीव्ही पत्रकारितेबद्दल बोलायचे तर ५५.६ टक्के इंग्रजी वृत्त अँकर हे उच्च जातीचे (ब्राम्हण) होते तर ओबीसी एससी, एसटी, एनटी या समुदायातील एकही अँकर नव्हते. 



इंग्रजी वृत्तवाहिन्यांमध्ये ओबीसी समाजातील अँकरचे प्रतिनिधित्व ११.१ टक्के होते. अभ्यास केलेल्या सात वाहिन्यांपैकी एकही ओबीसी समाजातील अँकर नाही. कार्यक्रमात आपले मत व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पॅनेलमध्येही ओबीसी, एससी, एसटी, एनटी या प्रवर्गातील लोकांचे प्रतिनिधित्व कमी आहे. हिंदी आणि इंग्रजीमधील प्राइम टाइम शोच्या सर्व पॅनेलमधील ६० टक्क्यांहून अधिक सदस्य सामान्य श्रेणीतील होते. हिंदी आणि इंग्रजीमधील वादविवादांमध्ये सहभागी झालेल्या पॅनेलमधील ५ टक्क्यांहून कमी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील होते.


डिजिटल मीडियामध्ये, इंग्रजी मधील ६८.५ टक्के बायलाईन्स उच्च जातीतील (ब्राम्हण) पत्रकारांनी छापल्या, ज्या सर्वाधिक होत्या. त्यानंतर फर्स्टपोस्ट (६१ टक्के) आणि स्क्रोल (५४ टक्के) यांचा क्रमांक लागतो. द वायरसाठी लिहिलेल्या सर्व लेखांपैकी निम्मे लेख सामान्य श्रेणीतील पत्रकारांनी लिहिलेले आहेत, तर १२.४ टक्के ओबीसी वर्गातील पत्रकारांनी, ३.२ टक्के एससी समुदायातील आणि ०.६ टक्के एसटी समाजातील पत्रकारांनी लिहिले आहेत. ‘मूकनायक’ हे एकमेव डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये बहुतेक लेख एससी समुदायातील पत्रकारांनी लिहिलेले होते. अहवालासाठी ९ वेबसाइटचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ईस्टमोजो, फर्स्टपोस्ट, न्यूजलॉंड्री, स्क्रोल, द वायर, द न्यूज मिनिट, स्वराज्य, द मूकनायक आणि द क्ंिवट यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post