अब्दुल कालपण टायर पंचर बनवत होता?.

अब्दुल कालपण टायर पंचर बनवत होता?.
         सर्वधर्मसमभाव मानणारा भारत सध्या हिंदुराष्ट्र बनण्याच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करीत आहे,असे चित्र निर्माण केल्या जात आहे. देशात बहुसंख्य हिंदू असतांना त्यांना सोळा टक्के मुस्लिम समाजा कडून प्रचंड धोखा निर्माण झाला आहे, त्यामुळेच "हिंदू खतरे मे" ची माऊथ पब्लिसिटी होत आहे. त्याला बहुसंख्य मागासवर्गीय हिंदू बळी पडत असल्यामुळे महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या कडे सर्वच दुर्लक्ष केले जात आहे. देशातील राज्यातील विरोधी पक्ष हिंदूचेच असल्याने त्यांना हिंदू मतदार, नागरिक पाहिजे त्या पद्धतीने सहकार्य करीत नाही.त्यामुळेच देशात अच्छे दिनच्या विरोधात कोणी उभे राहू शकत नाही.म्हणूनच कोणालाच महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या वाटत नाही,तर मुस्लिम समाजामुळे ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळेच त्यांची झळ हिंदूंना नाही तर मुस्लिम समाजाला कशी पोचत आहे.यांचा जरा हिंदूंनी विशेष बहुसंख्य मागासवर्गीय,आदिवासी यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
          मोहमद अब्दुल मुंबईत पोट भरण्यासाठी आला,तो सुशिक्षित नव्हता,लिहण्या वाचण्या पुरते त्याचे शिक्षण होते.त्यामुळे काही दिवस तो विलेपार्ले रेल्वे स्टेशन पश्चिम च्या नाक्यावर कामासाठी उभा राहत होता.बिगारी म्हणूनच मिळेल ते काम करत होता.कधी कडीया मिस्त्री च्या हाताखाली ,कधी प्लंम्बरच्या हाताखाली तर कधी पेंटर च्या हाताखाली काम करत होता,सुरवात ला तो रेल्वे स्टेशन वरच झोपत असायचा,त्यामुळे नाक्यावर च्या अनेक लोकांची आणि दुकानदारांची ओळख झाली. सत्यशोधक कामगार संघटनेचे नाका कामगारांचे अध्यक्ष अहमद ताज खान उर्फ सलीम भाई यांची ओळख झाली,मग त्यांनी विलेपार्ले रेल्वे फाटका जवळ टायर पंचर बनवणाऱ्या करीम चाचा ची ओळख करून दिली, आणि काम नसले तर इथे येऊन बसण्याचे सांगितले, त्यामुळे मोहम्मद अब्दुल यांची राहण्याची झोपण्याची सोय झाली. मग अब्दुल दररोज चाचाला टायर पंचर काढण्यासाठी मदत करू लागला.तीन महिन्यात अब्दुल टायर पंचरची सर्व कामे कशी करावी ते शिकला. करीम चाचाने अब्दुल ला हवा भरण्याचे पाच रुपये, पंचरचे दहा रुपये घेण्यास सांगितले. त्यामुळे आता सर्व कामे अब्दुल करतो.विलेपार्ले फाटका तुन जाणाऱ्या येणाऱ्या टू व्हीलर, फोर व्हीलर गाडी वाल्यानां अब्दुल पंचरवाला माहिती झाला.
          अब्दुल काल भी पंचर बनवत होता,आज ही पंचर बनवतो आणि उद्याही पंचर बनविणार आहे.काँग्रेसच्या राज्यात अब्दुल टायर पंचरचे दहा रुपये देत होता.आता आर एस एस प्रणित भाजपच्या मोदी राज्यात चाळीस रुपये पंचरचे घेतो,भविष्यात भारत हिंदू राष्ट्र बनले तर अब्दुलला कोणताही फरक पडणार नाही,अब्दुल चाळीस रुपयांचे पन्नास,साठ,सत्तर रुपये घेईल.नो इनकॉमटॅक्स,नो इस्टेटमेंट टॅक्स,नो पी एफ,नो जी एस टी,त्यामुळेच अब्दुल सह मुस्लिम समाज कोणत्या ही परिस्थितीत संकटात सापडनार नाही.महागाई,भ्रष्टाचार, बेरोजगारी यांचा परिणाम त्याच्यावर किंवा मुस्लिम समाजावर होणार नाही.मुस्लिम समाजातील अनेक अब्दुल,करीम,सलीम,शकील,वसीम,नसीम,सय्यद,निसार,शहजाद, असरुद्दीन,कमलूदिन,अल्ताप ग्रॅरेज,भाजीपाला,रिक्षा रिपेरिंग,इंटर डेकोरेशन,बांधकाम कंत्राटदार,साफ सफाई कंत्राटदार,कचरा,रॉबिट,माती उचलणारा,ट्रक,टेम्पोवाला कंत्राटदार, मंडप डेकोरेशन,केटरिंग वाला लग्न,पार्टीत मटण बिर्याणी सर्व प्रकारचे जेवण बनविणारा कंत्राटदार विविध क्षेत्रातील धंद्यात मुस्लिम समाज अग्रभागी आहे आणि भविष्यात राहील. त्यांच्या रोजीरोटी वर आज ही परिणाम होणार नाही व भविष्यात ही होणार नाही, आज ही तो नोंदणी नसणारा असंघटित कुशल कारागीर, कामगार आहे आणि उद्या ही राहील. महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी यांचा परिणाम त्याच्यावर किंवा मुस्लिम समाजावर होणार नाही.मग फरक कोणाला पडणार आहे, बहुसंख्य कट्टरपंथी हिंदू यांच्यावर होणार आहे.
           टू व्हीलर,फोर व्हीलर गाडी कोणा कडे आहे.त्याला अब्दुल ची गरज पडेल.तो पैसे देऊन पंचर बनवून घेईल.मग फरक कोणाला पडणार?. शर्माजी वर्माजी आणि शर्माजी वर्माजीच्या मुलामुलीला फरक पडेल.कारण शर्माजी वर्माजीचा मुलगा जो एका मल्टीप्लेक्स,मल्टी नेशनल कंपनीत काम करत होता तो आता घरी बसला आहे.कंपनीने कायम कामगारापेक्षा कंत्राटी कामगार कमी पगारात मिळतात म्हणून कामगारांना कामावरून कमी केले.शर्माजी वर्माजीला पेंशन मिळत होती.त्यातूनच त्यांचे या महागाईत सुद्धा घर खर्च चालत होता.शर्माजी वर्माजी चा मुलगा,मुलगी सहा वर्षा पासून यूपीएससी ची तयारी करत होता.त्यात तो आता वयाची मर्यादा पूर्ण केल्यामुळे ओवरएज झाला.रात्रदिवस यूपीएससी चा अभ्यास करून ज्ञान सागरात त्याने मिळविले परीक्षा दिली पण पेपर लिक झाल्यामुळे न्यायालयात केस सुरु आहे.अनेक ठिकाणी नोकर भारती निघाली पण न्यायलयात केस असल्यामुळे शर्माजी वर्माजीच्या मुलामुलींना नोकरी मिळाली नाही. महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या कडे पाहण्याचा दुष्टीकोन केंद्र सरकारने बदली केला.सार्वजनिक सरकारी उधोग धंद्याचे सरकारने खाजगीकरण करण्याचा झपाटा लावला.त्यामुळे अब्दुल ला कोणता ही फरक पडला नाही.आणि पडणार नाही.कारण त्याला प्रमोशन डिमोशन कोणती ही भिती नाही.
           भोसले,पवार,शिंदे फडणवीस गडकरी ठाकरे,खडसे,चतुर्वेदी,सिंग,सिंह,उपाध्याय,जोशी,गोखले यांची मुळे रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला होते. त्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेण्यात येईल असे युनियन ने रेल्वे बोर्ड मंत्री बरोबर करार केला होता.आता रेल्वेचे खाजगीकरण झाल्यामुळे सर्वच्या सर्व पोस्ट खतम करण्यात आल्या.एका मुस्लीम समाजाच्या अब्दुल ला तबाह करण्याच्या चक्रर मध्ये बहुसंख्य हिंदूच्या शर्मा,वर्मा,मिश्रा,पांडे,ठाकरे,खडसे,चतुर्वेदी,सिंग,सिंह,उपाध्याय, जोशी,गोखले यांना महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या बिलकुल जाणवत नाही.ते अगदी आनंदात हसत खेळत जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी कठीण काहीच नाही.फरक फक्त अब्दुल ला पडत आहे.आहे की नाही???.
महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या ह्या मुस्लीम इतर समाजाच्या आहेत.बहुसंख्य हिंदूंच्या नाहीत.त्यामुळेच अब्दुल काल भी पंचर बनवत होता,आज ही पंचर बनवतो आणि उद्याही पंचर बनविणार आहे.बहुसंख्य हिंदूचे काय ?.
सागर रामभाऊ तायडे ,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

Post a Comment

Previous Post Next Post