वाघीण ताईचा रेल्वेच्या धडकेत झाला मृत्यु




प्रतिनिधी / चंद्रपूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या दिल्ली ते चेन्नई रेल्वे मार्गावर राजुरापासून आठ किलोमीटर अंतरावरील चनाखा गावाशेजारी रेल्वेने धडक दिल्याने एका वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच उपवनसंरक्षक श्वेता बोडू, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चुनाळा वनक्षेत्र परिसरातून रेल्वे मार्ग गेला आहे. आज सकाळी रेल्वे गँगमन गस्त घालीत असताना त्याला रेल्वे रुळाशेजारी वाघीण मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वे विभागाने राजुरा वन विभागाला कळविले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड आणि क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत वाघिणीचे वय अंदाजे चार ते साडेचार वर्ष असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

O+

Post a Comment

Previous Post Next Post