अचानक आले रानडुक्कर; शिक्षक ठार



बामणी - कोठारी मार्गावरील घटना

बल्लारपूर: शिक्षक व शिक्षिका असलेली पत्नी दुचाकीने शाळेला जात असताना दुचाकी पुढे रानडुक्कर आडवे आल्यामुळे दुचाकी घसरून पडली व त्यात शिक्षक पती जागीच ठार, तर पत्नी जखमी झाली. हा अपघात बामणी-कोठारी महामार्गावर दिलासाग्राम शाळेजवळ शनिवारी सकाळी ८ वाजेदरम्यान घडला.

मृताचे नाव सुनील पत्रुजी कोवे (४९), रा. बामणी, तालुका बल्लारपूर असे असून यात जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीचे नाव शालिनी कोवे असे

आहे. सुनील हे येथून जवळ असलेल्या त्यांची पळसगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेला शिक्षक होते, तर त्यांची पत्नी दोघेही शालिनी या कळमना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. दोघेही रोज दुचाकीने शाळेला ये-जा करीत होते.

गाडी चालवताना सुनील यांनी हेल्मेट घातले होते. मात्र समोर रानडुक्कर दिसताच त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण बिघडले. यात दुचाकी एवढ्या जोराने खाली आदळली की त्यात त्यांचे डोक्यावरील हेल्मेट बाहेर पडले व डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले. कोवे यांना दोन मुली आहेत. या अपघाताची बल्लारपूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post