वैरागड येथे चोरांनी मध्यरात्री फोडले तीन दुकान...


वैरागड:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार वैरागड येथे तीन दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास तीन दुकानांमध्ये चोरांनी चोरीचा प्रयत्न केला त्यामध्ये अरुण हर्षे यांची ज्वेलर्स दुकान , ओम साई ज्वेलर्स आणि नंदनवार कपडा दुकान या ठिकाणी शटर फोडून चोराने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन दुकान फोडू शकले नाही फक्त एक दुकान फोडून चोरी केली .


चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये  झाली कैद - व्हिडियो
👇👇👇👇👇👇



 चोर महादेव मंदिर रोड वरून अरुण हर्ष ज्वेलर्स दुकानासमोर थांबऊन सेवरलेट कारमध्ये पाच चोर होते. त्यापैकी चार जण खाली उतरून सर्वप्रथम कटरने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुलूप न उघडल्यामुळे चोराने सब्बलचा वापर करून परत एकदा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु अरुण हर्षे यांच्या दुकानाच्या दरवाज्याला तीन लेयर सुरक्षा असल्यामुळे आणि ओम साई ज्वेलर्स या दुकानांचा शटर न निघाल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला नंतर त्यांनी आपला मोर्चा नंदनवार कपडा दुकान या ठिकाणी डल्ला मारून तिन शटर फोडून चोरी केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. या चोरीत 2 लाख 75 हजार रुपयाचा माल चोरी गेला अशी  माहिती मिळालेली आहे.



सदर चोर अरुण हर्षे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चार असल्याची घटनास्थळी दिसत आहे पण त्यांच्या सोबतीला अजून काही सहकारी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर चोरीचा प्रयत्न अरुण हर्षे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे . चोरांनी दोन सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा फोडल्याचे घटनास्थळी दिसत आहे .त्यामुळे वैरागड येथे एकच खळबळ उडालेली आहे. तरी पोलीस विभागाने तात्काळ या चोरीचा तपास करून या चोराचा कडक बंदोबस्त करावा अशी मागणी वैरागड येथील नागरिकांनी पोलीस विभागाकडे केली आहे. वैरागड येथे यापूर्वीसुद्धा चोराने धुमाकूळ घातलेला आहे हे मात्र विशेष.



Post a Comment

Previous Post Next Post