कसारी गावशेजारी कुजलेला प्रेताची अखेर ओळख पटली


देसाईगंज :- तालुक्यातील कसारी गावाशेजारी ५०० मीटर अंतरावर कुरखेडा मार्गालगत असलेल्या खड्डयात दुचाकीसह कुजलेला मृतदेह काल २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ च्या सुमारास आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ माजली होती.


विष्णु मनोहर आनंदे (३५) असे मृतकाचे नांव असुन तो अविवाहीत होता. मृतक विष्णू आनंदे, हा मु. पटाची देलनवाडी, ता. सिंदेवाही, जि. ,ता. चंद्रपूर येथील रहिवासी असुन गेवर्धा येथे त्याचे नातेवाईक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिथे तो आला होता . सदर अपघात घातपात हो की नाही या दिशेने  देसाईगंज पोलीस तपास करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post