कुंकू


🌹कुंकू 🌹

सौभाग्याचा लेन लावीला
कुंकवाचा लाल टिळा माथी
आजन्म राहावी आणि
शेवटी पर्यंत असावी मी सौभाग्यवती

तुम्हा उदंड आयुष्य लाभो
माझ्या कुंकवाच तेज वाढावं
जन्मभर साथ तुमचीच
तुमच्यात मी रमुन जावं

उपवास करेन पुन्हा पुन्हा
तुमच्या आरोग्या साठी
तुम्हीच आहात मजला
आधार आणि आनंदाची काठी

संकटाचा भार दुःखाचा डोंगर
झेलेन मी तुमच्या साथीने
सोबत हवी कायम अशीच
प्रार्थना करते देवा केविलवाने
सौभाग्याला नजर न लागो
देवा तुच हॊ कुंकवाच कैवारी
भीक मागते तूझ्या दारी
ही पातीव्रता नारी

सौं रेश्मा. ग. बावणे 🙏
कळमगाव

Post a Comment

Previous Post Next Post