कॅप्सूल ट्रॅकच्या धडकेत दोन ठार एक गंभीर जखमी

घुग्घूस:-   पडोलीकडे जाणाऱ्या कॅप्सूल ट्रॅकने दुचाकीला मागून धडक दिली यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


प्राप्त माहितीनुसार घुग्घूस कडून कॅप्सूल ट्रक क्रमांक एम एच 34/एबी 8677 हा पडोलीकडे जात होता तर सिदूर येथून एमआयडीसी येथे नवीन शोरूम दुचाकी वाहणाने टिबलसीट कामावर जात असताना चिंचाळा रस्त्यावरील आज सकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान हार्डवेअरच्या दुकानाजवळ कॅप्सूल ट्रॅकने मागून धडक दिली यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.यामुळे नागरिकांनी रस्त्यावर चक्का जाम करून वाहने रोखली या घटनेची माहिती पडोली पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.वृत लिहीत पर्यंत मृतकाचे नाव कळू शकले नाही

Post a Comment

Previous Post Next Post