कमलापूरच्या सरपंचावर गुन्हा दाखल

कमलापूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता येथील जुनी इमारत निर्लेखित केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश कडारलावार यांनी विरोध केला असता सरपंच श्रीनिवास पेंदाम यांनी कडारलावार यांना मारण्याची धमकी दिली.

याबाबत कडारलावार यांनी उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे तक्रार नोंदवली असता सरपंच पेंदाम यांच्या विरोधात भादवि ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ; वास्तविक जुनी इमारत निर्लेखीत करण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.

Post a Comment

Previous Post Next Post