उपाशीपोटी लसणाचे सेवन केल्याने वजन झपाटयाने कमी होते; पण 'या' महत्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवा...*

🫃🏻लठ्ठपणा ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती या समस्येने त्रस्त असते. वाढत्या वजनामुळे त्रासलेले लोक वर्कआउट करतात आणि आहारावर नियंत्रण ठेवतात, त्यानंतरही त्यांना हवे तसे शरीर मिळत नाही.

❓ *लसूण वजन कमी करण्यास कशी मदत करते?*

सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण त्यामुळे शरीरात साठलेली चरबी वितळते. लसणातील बूस्टिंग लेव्हल कॅलरी बर्न करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्ही वारंवार खाणे टाळता.

📃 जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लसूण चरबी जाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

🤔 *वजन कमी करण्यासाठी लसूण कसे खावे?* 

वजन कमी करण्यासाठी, दररोज रिकाम्या पोटी लसणाच्या २ पाकळ्या खा. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास लसणाचे सेवन करू नका. गरोदर स्त्रिया, लहान मुले, कमी रक्तदाब, रक्तस्त्रावाचे विकार आणि मधुमेहाचे रुग्ण यांनी या घरगुती उपायाचा अवलंब करू नये.

📌 *‘या’ गोष्टी लक्षात ठेवा* 

● लसूण जास्त खाणे टाळा कारण त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. २ पेक्षा जास्त लसणाच्या पाकळीचे सेवन करू नका.
● गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असलेल्यांनी लसूण खाणे टाळावे.
● लसणात असलेले काही संयुगे छाती आणि पोटात जळजळ करतात, त्यामुळे लसूण कमी खावीत.
● लसणामुळे काही लोकांमध्ये ऍलर्जी होऊ शकते आणि त्याच्या लक्षणांमुळे अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी, ओठ किंवा जिभेला मुंग्या येणे होऊ शकते. यामुळे नाकात खाज येऊ शकते. शिंका येणे आणि डोळ्यांना खाज येऊ शकते. त्यामुळे अशी एलर्जी दिसल्यास त्वरित लसूण खाणे टाळा.

Post a Comment

Previous Post Next Post