पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; आता फक्त चार दिवस पावसाचे! ‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीला होणार सुरुवात...*


🌧️ _राज्यात परतीचा पाऊस चांगला त्राहिमाम् माजवत आहे. राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची नासाडी होत आहे..._ 

💁🏻‍♂️ आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आता राज्यात फक्त पाच दिवस पावसाचे राहणार आहेत.

⛈️ राज्यात 14 आणि 15 ऑक्‍टोबर रोजी पाऊस पडणार आहे मात्र पावसाचा जोर खूपच कमी राहील. शिवाय राज्यात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

⛅ मात्र राज्यात 17 ऑक्टोबर नंतर पावसाची उघडीप राहणार आहे. राज्यात 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी दाट स्वरूपाचे धुके पाहायला मिळणार आहे. तसेच 19 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. निश्चितच थंडीला सुरुवात झाल्यानंतर फळबाग पिकांना मोठा फायदा होणार आहे.

👉🏻 एकंदरीत राज्यात आता फक्त चार दिवस पावसाचे राहिले आहेत. त्यामुळे चार दिवसानंतर राज्यात शेती कामाला मोठा वेग येणार आहे शिवाय रब्बी हंगामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. दरम्यान सध्या कोसळत असलेल्या परतीचा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post