रॅलीतून वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचा संदेश

चामोर्शी:- वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शी व सामाजीक वनीकरण ,गडचिरोली च्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय,चामोर्शी , सामाजीक वनीकरण गडचिरोली व जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा चामोर्शी येथे रॅली काढून वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत संदेश देण्यात आला.







उपवनसंरक्षक राहुलसिंग टोलिया, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी प्रदिप बुधनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, चामोर्शी आर.बी.इनवाते व वनपरिक्षेत्र अधिकारी,सामाजीक वनीकरण,गडचिरोली ठेंबरे साहेब यांनी वनकर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी येथिल विद्यार्थ्यांची रॅली काढून वन्यजीवांचे महत्व पटवून दिले. तसेच वने व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रॅलीदरम्यान वनकर्मचारी ए.व्ही.लिंगमवार क्षेत्रसहाय्यक चामोर्शी, सिध्दार्थ गोवर्धन क्षेत्रसहाय्यक जामगिरी ,वनपाल नागापुरे ,वनरक्षक आनंद साखरे, विवेक अलोने, विनोद गोल्लेवार, रविंद्र जुवारे,सुधाकर झाडे, विठ्ठल मेश्राम, धनंजय कुमरे, कैलास नैताम, विकास लांजेवार, अक्षय राऊत, किशोर वैरागडे,महेश कोरवते,अझर शेख, कु.करुणा रामटेके, कु.निराशा मेश्राम वाहन चालक दिपक दुधबावरे वनमजूर ईश्वर जनबंधु , देवराव आदे आदींसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post