गडचिरोली जिल्ह्यात या ठिकाणी होणार रावण पूजा

गडचिरोली :- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर नजीकच्या कोडसेलगुडम मध्ये मागिल 7 वर्षांपासून लंकापती रावणाची पूजा करण्याची परंपरा सुरू आहे. 2015 मध्ये फक्त 3 गावातील नागरिकांनी रावणाची पूजा करण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. आता 7 वर्षांच्या कालावधीत शेकडो गावांतील आदिवासी बांधव रावणाची पूजा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. आदिवासी समाजातर्फे कोडसेलगुडम येथे रावण पुजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथे तीन दिवस रावणाची पूजा केली जाते. यंदाही या रावणी पूजन कार्यक्रमात शेकडो गावातील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.



एकीकडे विजयादशमीला सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असताना  जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील परसवाडी या गावात विजयादशमील परंपरेनुसार रावणाची पुजाअर्चना केली जाणार आहे. स्थानिक नागरीक लंकापती रावणाला न्यायप्रिय राजा मानित असून त्यांचा सन्मान करीत आले आहे. आदिवासींचे दैवत असलेल्या रावणाने आदिवासी समाजासाठी अनेक कार्य केल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे रावणला श्रद्धास्थानी ठेवून परसवाडी येथे मागील अनेक वर्षांपासून रावणाची पुजाअर्चना केली जात आहे. या दिवशी विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही ग्रामस्थांकडून केले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post