ओंजळीतून निसटून जाते वेळ हा फुलपाखरू, मनातील इच्छा वाट पाहते मन माझा वाटसरू.


ओंजळीतून निसटून जाते वेळ हा फुलपाखरू,
मनातील इच्छा वाट पाहते मन माझा वाटसरू.

एकांत मन विचारमग्न तल्लीन,
शोध घेता स्वतः चा मन गेले हरपून.

विचारांचा गोंधळ मन झाले बेचैन,
समजावून सांगतो स्वतः च मनाला कधी येईल सुकून.

सांत्वनेचा आधार स्वतःलाच देऊन,
सांभाळतो स्वतःलाच स्वतः च समजावून.

नित्य निजतो वेळेत उठतो वेळेत,
नियमित नित्य कामात जुपतो मी खेळत.

संकल्प मनात दृढ आहे एक ओढ़,
जीवनात ठेवून एक ध्येय जीवन बनवील गोड.

     शब्द: संतोष नंदिगमवार

Post a Comment

Previous Post Next Post