पिकांवर रोगांची सर्जिकल स्ट्राइक..... पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ...

चिमूर:-  तालुका तांदूळ उत्पादन पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे पीक म्हणून याकडे पाहिले जाते तांदूळ पिकाच्या उत्पादनातून येथील शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक चक्र फिरत असते, तालुक्यामध्ये दोन प्रकारच्या धानाचे उत्पादन केले जाते मध्यम आणि जड असे दोन प्रकार असून बहुतांश शेतकरी हे जळ धानाची लागवड करतात.



मागील तीन महिन्यापासून ज्या पिकांची शेतकऱ्यांनी जपणूक केली एन मोक्याच्या क्षणी धानावर विविध (नवीन) रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून हाती आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
आधीच अतिवृष्टीच्या प्रकोपाला सामोर गेलेला शेतकरी आता पिकावर लागलेल्या रोगामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडणार आहेत त्यामुळे तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून पिकाचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस चिमूर, अविनाश अगडे शहर अध्यक्ष चिमूर यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post