मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*






मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा आज संपन्न झाली.
 ही कार्यशाळा पंचायत समिती चंद्रपूर आणि उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे पार पडली.

प्रत्येक विद्यार्थाना त्यांच्या जीवनात असलेले शिक्षणाचे महत्त्व व जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्व समजणे गरजेचे असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यास ते आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होतील असा विद्यार्थी घडविण्याचे हा ध्येय समोर ठेऊन मा. प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून चंद्रपूर तालुक्यामध्ये स्केल प्रकल्प अंतर्गत 7307 विद्यार्थाना जीवन कौशल्य शिक्षण दिल्या जात आहे. या प्रकल्प संधार्भात संपूर्ण माहिती करिता चंद्रपूर तालुक्यातील गट विकास अधिकारी, गट शिक्षणअधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, विषयतज्ञ यांची कार्यशाळा पंचायत समिती चंद्रपूर आणि जी. प. उच्च प्राथ. शाळा बोर्ड येथे क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. 



या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले  
मा. श्री आशितोष सपकाळ सर गट विकास अधिकारी चंद्रपूर 
मा. श्री निवास कांबळे सर गट शिक्षणाधिकारी चंद्रपूर (प्रमुख अतिथी)
मा. श्री बापूराव मडावी सर विस्तार अधिकारी चंद्रपूर (प्रमुख अतिथी)
मा. धनराज आवारी (विस्तार अधिकारी चंद्रपूर )
मा. श्री प्रश्नात लोखंडे सर वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर (प्रमुख मार्गदर्शक) आदी उपस्थित होते. 

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर तालुक्याची कामाची पाहणी करण्याकरिता गट विकास अधिकारी , गट शिक्षणाधिकारी चंद्रपूर ,विस्तार अधिकारी ,BRC टीम , केंद्र प्रमुख, यांनी बोर्डा शाळेला भेट दिली. 
     जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा शाळेतील बालमंत्रिमंडल सभा , शिक्षकांनी घेतलेले सत्र, शाळेचे धेय्य, लर्निग सेंटर आणि अभ्यास कोपरा दाखविण्यात आले. अभ्यास कोपरा आणि लर्निग सेंटर चा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो. हे सर्व कंपोनंट कार्यशाळेच्या माध्यमातून बघण्यात आले.
याच दरम्यान सर्व पाहुण्यांचे सत्र पियर लीड ने घेतले या सत्रा मधे सर्व पाहुण्यांनी आनंद सुद्धा घेतला. 
 बालमंत्रीमंडानी पाहुण्यांना विद्यार्थ्याच्या घरी तयार केलेले अभ्यास कोपरे दाखविले . हा अभ्यास कोपरा का घरी असला पाहिजेल . आपल्याला कसा अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे हे सांगण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रम व्यवस्थित पाने पार पडावे या साठी शाळेतील बाल मंत्रिमंडळ यांनी प्रयत्न केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उच्च प्राथमिक शाळा बोर्डा चे मुख्याध्यापक मा. सुनील गेडाम सर, सहाय्यक शिक्षक प्रशांत काटकर सर,
मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी नालंदा बोथले, पायल राजपूत , संदेश चुनारकर, सतीश खंडारे , गणेश दुदबले , समूदाय समन्वयक सचिन डोर्लिकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post