उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान


आरमोरी:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. आरमोरी च्या वतीने शंकरनगर येथील स्वयंसहय्यता समूहातील महिला सदस्य गीता राय यांचे पंचायत समिती समोरील दिवाळी सणानिमित्त फराळ विक्री केंद्राचं उद्घाटन प. स.चे विस्तार अधिकारी मा.पारधी सर यांचे हस्ते करण्यात आले..उमेद च्या वतीने ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरण करणेसाठी ग्रामीण भागात स्वयं सहाय्यता समूह तयार करण्यात आले..या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांची उपजीविका मध्ये वाढ व्हावी व त्यांना व्यवसायाप्रती जिज्ञासा आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी घरी तयार केलेल्या वस्तूंना वर्षभरात येणाऱ्या सण समारंभाचे औचित्य साधून एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे..त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उमेद परिवाराच्या वतीने गाव स्थरावर,तालुका स्थरावर व जिल्हा स्थरावर दिवाळी सणाच्या औचित्य साधून दिवाळी फराळ विक्री केंद्र स्थापन करून महिलांनी घरगुती तयार केलेल्या खाद्यपदार्थ व इतर वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जात आहे..आज आरमोरी येथे दिवाळी फराळ विक्री केंद्राच्या उदघाटन वेळी उमेदचे तालुका अ.व्यवस्थापक बोबाटे सर,तालुका समन्वयक बोडेले सर, लाऊतकर सर, मोडक मॅडम,प्रभाग समन्वयक पगाडे सर,लेखापाल झलके मॅडम व कॅडर उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post