आनंद बाल मेळावा उत्साहात संपन्न*


   केशरी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा किशोरी आनंद बाल मिळाव्याचे आयोजन 

सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी गणेश काडगाये

 अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केशोरी येथे आनंद बाल मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन गीता बडोले मॅडम यांनी केले तर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक पी एन जगझापे हे होते. आनंद बाल मेळाव्याचे आयोजक गुंफेस बीसेन, हेमंत पवनकर, पवन कुमार कोहळे हे होते. या आनंद मेळाव्यात बाहेरील विद्यार्थ्यांची सुद्धा उपस्थिती अतुलनीय होती. या मेळाव्यामध्ये आरूसी गहाणे, उर्वशी गहाणे, समयरा पठाण, कोमल बेलखोडे, पार्थ मेश्राम, रिद्धी वानखेडे, आदेश गेडाम, उमाकांत देशकर, लक्ष्मी पगडे, प्राची किरणापुरे, भाविक नंदरधने, प्रतीक लंजे, कुणाल शेंडे, श्रावणी वलथरे, आरोही चवरे, साची सुकारे, अर्जुन पालीवाल, जीविका शहारे, हिना देशकर, तनुजा उपरीकर, इत्यादी विद्यार्थ्यांनी भजे, पोहा, चमन ढोकळा, भेलपुरी, गुलाब जामुन, पाणीपुरी, काकडी, पुरी भाजी, उकडलेल्या बोरी इत्यादी पदार्थ घरून भरून आणून आपापले स्टाल लावले. इतर विद्यार्थी तसेच शिक्षकांनी स्टॉल वरील पदार्थ खरेदी करून त्या पदार्थांचा भरभरून आस्वाद घेतला. विकलेल्या पदार्थातून गोळा झालेले पैसे पेन पुस्तका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येतील असे विद्यार्थ्यांनी सांगितले. असा हा बाल मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन बाल आनंद मेळावा गोड करून घेतला त्याबद्दल आनंद व्यक्त केला.



Post a Comment

Previous Post Next Post