जबरान जोत धारकांना जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे*


नवेगाव बांध:- सामाजिक परिवर्तन संघटनेच्या वतीने दिनांक19/10/022ला नवेगाव बांध येथील ग्रामपंचायत भवनाच्या मैदानात जबरानजोत धारकांची सभा अनिरुध्द शाहारे यांच्या अध्येक्षतेत घेण्यात आली.

*मार्गदर्शक*:-विलाश भोगांडे ,दिनानाथ वाघमारे,समिक्षा गणविर म्हनुन उपस्थित होते.अर्जुनी मोरगांव तालुक्यातिल सर्व जबरानजोत धारकांना पट्टे मिळाले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात पट्टे मिळण्यासाठी दावे दाखल केलै पन ते अजुन पर्यत प्रलंबित आहेत. असै मत उपस्थित जबरान जोत धारकांनी व्यक्त केले.



*विलाश भोगांडे* यांनी अर्जुनि मोरगांव तालुक्याची परीस्थिती,आदिवासी व ईतर परंपरागत वननिवासी कायदा 2006 कसा तयार झाला... कुठल्या स्तरावर आपल्याला दावे दाखल करावे लागतात... काय पुरावे जोडावे लागतात. यांची मांडनी केली व जमिन मिळाली पाहीजे ही मागनी संविधानातील उपजिविकेच्या अधिकाराच्या अनुसंगाने केली पाहीजे व पट्टे मीळण्यासाठी लढा दिला पाहीजे असे मार्गदर्शन केले.तर *दिनानाथ वाघमारे* म्हनाले की जबरान जोत धारकांनी जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी संघटित होउन संघर्ष केला पाहिजे. तर *समिक्षा गणविर*
बोलतांना म्हनाल्याकी आपला देश कृषी प्रधान देश आहै. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्यावर अवलंबुन आहै. ज्या जमिनी कसण्याचे काम आपन करतो त्याचा हक्क मिळण्यासाठी सामाजिक परीवर्तन संघटनेच्या नेतृत्वात लढा दिला पाहीजे.
*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *मनिषा शाहारे* यांनी केले. संचालन अल्का मडावी यांनी केले .तर आभार प्रदर्शन गनिता खोबा यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी संध्या लोथे,मयुरी काले,पुष्पा कराडे,सोनु किंचक,करुना कराडे,सुंनदा सोनटापर,यांनी प्रयत्न केले..
*या कार्यक्रमात नवैगांव बांध,जुनेवानी,कन्हाळगांव,अरकतोंडी,भरनोली,बोवरटोला,वारवी,परसटोला,धमदीटोला,बोळदा,कर्‍हांडली,केळवद,सुरबन,तिरखुरी,नवनितपुर,महालगांव,बलिटोला , तिरखुरी या गावातिल जबरानजोत धारक उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post