अतिवृष्टी ग्रस्त यादित सुटलेला शेतकऱ्यांचे नावे नव्याने समाविष्ट करा अन्यथा तिव्र आंदोलन



गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांचे नायब तहसीलदार दोनाडकर यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


आरमोरी - तालुक्यात अतिवृष्टीमुळे व विविध नदी नाल्याच्या महापुरामुळे शेत पिक पाण्याखाली जाऊन जोगीसाखरा, पळसगांव, रामपुर, कासवी, आष्टा, ठानेगाव अंतरजी, मोहझरी, शिवनी, किटाळी भाकरोंडी व इतर गावातील शेतकऱ्याचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत देण्याची घोषणा करीत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुध्दा केली. शासनाच्या आदेशानुसार संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले नाही. अशा शेतकऱ्याचे नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. यामुळे खरा नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यामध्ये सर्वे करणा-या संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकार्याप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. करीता वरिष्ठ स्तरावरून सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारना करून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकन्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यात यावा यासाठी गडचिरोली अदिवासी कांग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन देऊन नायब तहसिलदार दोनाडकर यांच्या सोबत चर्चा करताना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की,साहेब यादीत घोळ आहे की घोळात यादी कारण असे शेतकरी पूरग्रस्त दाखविले की जर त्यांची शेती पाण्याखाली गेली तर किती गावे पूरग्रस्त होतील व एकाच सातबाऱ्यावर 1 हेक्टर जमिनीवर तीन भावांचे नावे असतील तर प्रति भावांना किती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अश्या प्रकारचे प्रश्न विचारले व नायब तहसिलदार यांच्या असेही निदर्शनास आणून दिले की तिन्ही भावांच्या नावाने 1 हेक्टर नुकसान भरपाई जमा झालेली आहे म्हणजेच 1 हेक्टर नुकसान व भरपाई 3 हेक्टर मिळालेली आहे यावर त्यांनी सभा आयोजित करून आपल्या विषयांचा उलगडा करून न्याय देण्यात येईल असे सांगितले.असता अतिवृष्टी ग्रस्त यादित सुटलेला शेतकऱ्यांचे नावे नव्याने समाविष्ट करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल इशाराही गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सरपंच विलास उसेंडी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर टेभुने.कालीदास जाळे अनिल बाबटे चिंतामण नाहामृते दलित ढवळे कैलास नंदेश्वर सखाराम कुमोटी गिरीधारी मेश्राम निरगशहा ऊईके अलिराम पदा बाबुराव हजारे प्रेमानद ईदुरकर भिमराव जनबधु बालाजी नेवारे निलकंठ जनबधु मारोती जनबधु नलीना जनबधु तुळशिराम हलामी शेखचद्र शेख मुलिधर जांभुळे गुरुदेव सरपे देवराव ठाकरे तुकाराम दुर्गा कमलाबाई दरौ जगदिश मडावी हिरामण बोगा तुळशिराम पोटावी ताराबाई कुजाम अमोल सहारे वासुदेव बगमारे सदाशिव घरत यासह शेकडो अन्याय ग्रस्त शेतकऱी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post