काय निवडायचं ? फटाके 💥की पुस्तके 📚


*काय निवडायचं ?*

*फटाके* 💥की *पुस्तके* 📚

*फटाके* मोठा आवाज ⚡करतात.
*पुस्तके* शांतपणे हळूवार भेटतात.

*फटाके* हवेचं प्रदूषण 🙊करतात.
*पुस्तके* वैचारिक प्रदूषण दूर करतात.

*फटाके* अक्षरशः पैसे 💵जाळतात.
*पुस्तके* मात्र पैसे 💰उभे करतात.

*फटाके* लहानग्यांना इजा 🤕करतात
*पुस्तके* बाळांना 👶🏻छान रमवतात

*फटाके* पक्षीप्राण्यांना 🐥घाबरवतात
*पुस्तके* 📖सर्व माहिती पोहोचवतात

*फटाके* कान किर्रर करुन सोडतात.
*पुस्तके* मानसिक समाधान 💆🏻‍♂देतात.

*फटाके* माणसाचा अहंकार कुरवाळतात.
*पुस्तके* माणसाला जमिनीवर ठेवतात.

*फटाके* विध्वंसक मूल्य 🔥रुजवतात.
*पुस्तके* रचनेचा ♻आग्रह धरतात.

*फटाके* क्षणभर प्रकाशातून अंधाराकडे नेतात.
*पुस्तके* तिमिरातूनी तेजाकडे वळवतात.

*फटाके* म्हणजे बालमजूरीला प्रोत्साहन.
*पुस्तके* म्हणजे बालबुद्धीला आवाहन.

*फटाके* ही तर खरीखुरी विकृती.
*पुस्तके* च उभी करती मानवी संस्कृती.

भूषण नित्य वाजवी विवेकाची घंटा
फटाक्यास फाटा देवूनि *पुस्तकेच* वाटा

*आता काय निवडायचं*
तुम्हीच ठरवा !
*विवेकाचा आवाज बुलंद करुंंया*📢

Post a Comment

Previous Post Next Post