माता शत्रू,पिता वैरी,येन बालो न परिणत: !



हिंदू लोक मुलगी उपवर झाली तरीही लग्न करीत नाहीत.यात मुसलमान तरूणांचा काय दोष?
लव्ह जिहाद साठी मुसलमान तरूणांना दोष देतो.ते चुकीचे आहेच.ते कधीही योग्य नाहीच.पण आपली मुलगी लग्नाच्या वयात आली तरीही लग्न करीत नाहीत.ती मुलगी तोंडाने सांगत नाही कि,आई ,बाबा माझे लग्नं करा हो!जर सांगितले तर आई बाबा नाव ठेवतील.शेफारली ही. तिने नाही सांगितले तरी ती लग्नाच्या वयात,लग्नाच्या मानसिकतेत आली आहे, हे आई बाबांना समजले पाहिजे.बापाचे बूट पोराला होऊ लागले.आईची साडी नेसून पोरगी फोटो काढू लागली.कधी काळी आपण ही या वयात ,या अवस्थेत,या मानसिकतेत आलो होतो.आपल्याला वाटत होते कि,आई बाबा ने आपले लग्न करावे.पण सांगेल कोण?
मी स्वतः तरूण मुलीचे अभिनय, हालचाल पाहून सांगितले, तेंव्हा तिच्या बाबाने मला खेकसले.तिच्या आईने चूलीवरचा चहा उतरवला.चूल विझविली.नंतर जेंव्हा तिच मुलगी फेसबुक फ्रेंड सोबत पळून गेली तेंव्हा तिची आई मला सोबत घेऊन एसपी कडे गेली होती.एसपी ला म्हणे, माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले.तुम्ही ताबडतोब शोधून आणा.
    ती बाई,म्हणजे मुलींची आई जास्त रूबाबात बोलली तेंव्हा एसपी म्हणाला, तुम्ही पोरगी सांभाळू शकत नाहीत आणि मला सांगता, ताबडतोब शोधून आणा.हे एकच काम आहे का आम्हाला ?ती कोणाबरोबर पळून गेली, ते तुम्हाला माहिती आहे.आणि का पळून गेली?ते शिवराम पाटील तुम्ही सांगा. तेंव्हा मी खजील झालो.खरे आहे.ती मुलगी लग्नाच्या वयात आली तेंव्हा मी यांना सुचवले होते.पण ऐकते कोण? म्हणे,तिला नोकरी पाहिजे.नंतर बघू लग्नाचे.
   हे बोलणे तिने ऐकले.आणि तिचा आई बाबा वरचा विश्वास उडाला.तिने आता स्मार्ट फोन वर जोडीदार शोधणे सुरू केले.फेसबुकवर,वाटसअप वर चैटींग सुरू केले.नंतर डेटींग.आणि आता मिटींग.गेली पळून.
   दोन महिन्यांत पोलिसांनी तिचा ट्रेस लावला.तिचा फोन जीपीओ कोल्हापूर जिल्हयात एका खेड्यात येत होता.तिच्या आईला,बाबाला गाडीत घालून पोलिस कोल्हापूर पोहचले.मी मात्र सोबत जाणे नाकारले.तिने लग्न करून संसार सुरू केला होता.पण आई ने काहीतरी नौटंकी करून ब्लैकमेलींग करून गाडीत घालून परत आणले.फोन हिरावून घेतला.गांव बदलले.तरीही त्या मुलीने दुसरे प्रकरण केलेच.मला कळले तर मी खूप घाणेरडे बोललो.मुलीला नाही.तिच्या आई बाबांना.
माता शत्रू पिता वैरी,येन बालों न परिणत:!
न शोभते सभांमध्ये हंसमधे बको यथा!

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post