पंजाब डख यांच्या अंदाजानुसार राज्यात ‘या’ तारखेपर्यंत पाऊस कायम, तर ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस!*


💁🏻‍♂️ राज्यात सध्या परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात परतीचा पाऊस बरसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मते आज राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

👉🏻 *प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख* यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील *औरंगाबाद,* जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता स्पष्ट केले आहे. तसेच आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

🗣️ *डख यांच्या अंदाजानुसार या तारखे पर्यंत पावसाची शक्यता..* 

दरम्यान पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाज हवामान अंदाजानुसार आजपासून राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. खरं पाहता 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

👨🏻‍🌾 *शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन* 

यामुळे बांधवांनी आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी. सध्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची काढणी करत आहेत. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांची शेती जसे की, मका सोयाबीन गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी लगेचच शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवुन घ्यावा.


Post a Comment

Previous Post Next Post