म्हणून चक्क पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम उकळते पाणी ओतले

देशात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून तामिळनाडू राज्यातल्या राणीपत इथे 29 वर्षीय तरुण पत्नीने आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर चक्क पतीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम उकळते पाणी ओतलेले आहे. सदर घटनेत बत्तीस वर्षाचा पती गंभीर जखमी झालेला असून त्याचा प्रायव्हेट पार्ट सुमारे 50 टक्के भाजलेला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर पत्नी ही सातत्याने त्याच्यावर चारित्र्याच्या कारणावरून संशय घेत होती. प्रिया असे 29 वर्षीय पत्नीचे नाव असून थांगराज असे तिच्या पतीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती मात्र तिने संतापाच्या भरात पती घरी झोपलेला असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते पाणी ओतले त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.


पती जोरजोरात ओरडू लागल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून मोठ्या सरकारी रुग्णालयात त्याची रवानगी करण्यात आली. सदर दाम्पत्याचे सात वर्ष आधी लग्न झाले होते त्यांना एक मुलगी देखील आहे मात्र आपल्या पतीचे इतरत्र अफेअर चालू आहे यावरून त्यांच्यात वाद झाला होता. पत्नी प्रिया हिने याच रागातून गिझरमधील गरम पाणी बादलीत भरलं आणि झोपी गेलेल्या आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले त्यामध्ये तो 50% जखमी झालेला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post