माझ्याकडे पैसे होते तोपर्यंत तिने मजा मारली अन आता..’, प्रेयसीचे कारनामे लिहून अखेर..

ठाणे:- एक खळबळजनक घटना ठाणे येथे समोर आणले असून एका तरुणाने प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्जे उचलली आणि त्यानंतर आत्महत्या केली आहे मात्र त्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असून त्यात तिचे नाव नमूद केलेले असून आपण प्रेयसीमुळे कर्जबाजारी झालो आणि तिला पैशाची मागणी केली असता उलट तिच्याकडून आपल्याला पोलिसात अडकवण्याची धमकी देण्यात येत होती त्यामुळे आपण हतबल झालेले आहोत असे लिहिलेले आहे.

कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विक्रम मोरे ( वय 26 ) असे मयत तरुणाचे नाव आहे. विक्रम याचे परिसरातील एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेम संबंध होते. तिच्या मागणीवरून विक्रम याने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र तरुणीने पैसे काही परत केले नाहीत म्हणून या फायनान्स कंपनीने विक्रम यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी तगादा सुरु केला. तरुणीला पैसे मागितल्यानंतर तिने विक्रम याला कर्जाचे हप्ते तूच भरून टाक, असे सांगत शिवीगाळ करून पोलिसात तक्रार देईल अशी देखील धमकी दिली.

कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपण वापरलेच नाहीत म्हणून विक्रम कर्जबाजारी झालेला होता तर त्याला काहीच सुचत नव्हते. फायनान्स कंपनीदेखील त्याला सातत्याने पैशासाठी तगादा लावत होती त्यानंतर त्याने आपल्या राहत्या घरी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काम जोपर्यंत होते तोपर्यंत प्रेयसी गोड बोलत होती मात्र कर्ज झाल्यानंतर तिने मला टाळण्यास सुरू केले त्यानंतर मला ब्लॉक देखील केले मात्र माझ्या पैशाने तिने मजा मारली. केस स्ट्रेटनिंग केले मात्र तिचा फायदा काढून झाल्यावर ती माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली. आता तिचे दुसऱ्या मुलासोबत संबध असून ती त्याच्याकडून मला मारण्याची धमकी देत आहेत , असे देखील विक्रमने चिठ्ठीत लिहिलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post